शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शनी अमावस्येनिमित्त हजारो भाविक शनिचरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 18:21 IST

शनी अमावस्येनिमित्त शनिवारी (दि.४) शिंगणापूर येथे हजारो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. पहाटे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, शनिभक्त राकेश कुमार (आॅस्ट्रेलिया), सौरव बोरा (मुंबई) यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

सोनई : शनी अमावस्येनिमित्त शनिवारी (दि.४) शिंगणापूर येथे हजारो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले.पहाटे ४.०३ वाजता अमावस्येला सुरुवात झाली असून रविवारी पहाटे ४.१५ पर्यंत अमावस्या असल्यामुळे आहे. त्यामुळे शनिवारी पहाटेपासून भाविकांची शिंगणापूर येथे शनी दर्शनासाठी गर्दी झाली. पहाटे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, शनिभक्त राकेश कुमार (आॅस्ट्रेलिया), सौरव बोरा (मुंबई) यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी राज्याच्या आदर्श गाव कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार उपस्थित होते.देवस्थानतर्फे पार्किंग व्यवस्था, आरोग्य, प्रसाद, पिण्याचे पाणी, माहिती सुविधा आदी सुविधा देण्यात येत आहे. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चौथऱ्याजवळ मंडप उभारला असून, देवस्थानजवळील खाजगी जमिनीवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली.सूर्यपुत्र शनिदेव महाराज की जय, पवनपुत्र हनुमान की जय अशा जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता. मंदिर व परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी भाविकांचे शाल, श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन सन्मान केला. रस्त्याच्या बाजूंना तेल, आरतीचे साहित्य, खेळणी दुकाने लावण्यात आली होती़भाविकांसाठी मोफत अन्नदानाची व्यवस्थाही करण्यात आली होती. मंदिर परिसरात सुरु असलेल्या रक्तदान शिबीरात अनेक भाविकांनी रक्तदान केले. गर्दीवर सी.सी.टी.व्ही कॅमेरे लक्ष ठेवून होते. शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshani shinganapurशनि शिंगणापूर