शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा रूग्ण आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 16:53 IST

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण मंगळवारी (दि. २४ मार्च) आढळून आला. त्याचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविण्यात आला होता. त्याचा मंगळवारी अहवाल आला. त्यात तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण मंगळवारी (दि. २४ मार्च) आढळून आला. त्याचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविण्यात आला होता. त्याचा मंगळवारी अहवाल आला. त्यात तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. हा रुग्ण परदेशातून आलेला नाही किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातही आलेला नव्हता.          सदरचा रुग्णाला सर्दी, खोकला येत असल्याने तो स्वत:हून रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. यावेळी त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. तो कोणाच्याही संपर्कात आलेला नव्हता. त्याला लगेच नगर येथील एका रुग्णालयातील विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. सदरचा रुग्ण हा एका शहरातला असून तो विदेशातून किंवा अन्य कोणत्या गावातून आलेला नव्हता. हा वेगळा स्वतंत्र रुग्ण आढळला असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून आता लोकांनी मोठी खबरदारी घेण्याची गरज आहे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील २०८ जण संशयित असल्याचे आढळून आले होते. त्यापैकी जवळपास १९७ जणांना घरी पाठविण्यात आलेले आहे. याशिवाय दोन जणांचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी एक पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य