अहमदनगर : नगर तालुक्यातील बु-हाणनगर येथील तुळजाभवानी देवीचा मुकुट चोरट्यांनी लांबविला. शुक्रवारी मध्यरात्री तुळजाभवानी देवी मंदिरात चोरी करून देवीचा मुकुट चोरून नेला. मुकुट व तीन ते चार किलो चांदी चोरट्यांनी लांबविले.मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चार ते पाच चोरटे दिसून येत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
बु-हाणनगरच्या तुळजाभवानी देवीचा मुकुट चोरट्यांनी लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 14:43 IST