लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कर्जत तालुक्यात पोलिसांच्या वाहनावर चोरट्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील धांडेवाडी येथून तीन गायी पिकअपमधून चोरून नेत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. चोरीची माहिती पोलिसांना मिळताच नगर-सोलापूर राज्यमार्गावर या पिकअपचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरु असताना अज्ञात चोरट्यांनी पोलीस गाडीवर गोळीबार केला. यामध्ये पोलिस गाडीच्या चालकास पायाला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. चोरट्यांनी काही अंतरावर गायीसह पिकअप सोडून पळून गेले.
चोरट्यांचा पोलिसांच्या वाहनावर गोळीबार, चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 13:14 IST