गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अजित शिंदे आणि आकाश आगळे हे दोघे वाहन घेऊन एक्साइड कंपनीमध्ये बॉक्स बॅटरी व प्लेट नेण्यासाठी आले होते. शिंदे आणि आगळे बॉक्स बॅटरी व प्लेट वाहनात भरत असताना एक्साइड कंपनीचे सिक्युरिटी रवींद्र इंगळे यांनी त्यांच्या वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये लीडचे नऊ बंडल आढळून आले. त्याबाबत इंगळे यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी काही उत्तर दिले नाही. त्यानंतर इंगळे यांनी हा प्रकार प्लॅट हेड संतोष डबीर यांना कळविला. त्यानंतर तपासणी केली असता शिंदे आणि आगळे यांनी ४० हजार रुपयांच्या नऊ बंडलची चोरी केल्याचे निदर्शनास आले. याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिल्यानंतर आरोपींना ताब्यात घेतले असून, अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
............