शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नर्सरीचे ऑफीस फोडून चोरट्यांनी बी बियाणे लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 10:32 IST

घारगाव : अष्टविनायक हायटेक नर्सरीचे ऑफीस फोडून चोरट्यांनी विविध जातीचे बी बियाणे व रोख रक्कम असा एकूण एक लाख आकरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

नर्सरीचे ऑफीस फोडून चोरट्यांनी बी बियाणे लांबविले 

 घारगाव येथील घटना : चोरटे सिसिटीव्हीत कैद 

घारगाव :  अष्टविनायक हायटेक नर्सरीचे ऑफीस फोडून चोरट्यांनी विविध जातीचे बी बियाणे  व रोख रक्कम असा एकूण एक लाख आकरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे नाशिक पुणे महामार्गालगत मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. चोरटे सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.           याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप तान्हाजी लेंडे हे (आळेफाटा ता.जुन्नर जि.पुणे) येथील रहिवाशी असून त्यांची घारगाव शिवारात अष्टविनायक हायटेक नर्सरी आहे. त्यांनी विक्रीसाठी झेंडू, टोमॅटो, कोबी,वांगे,मिरची,शेवगा, आदी बी बियाने विक्रीसाठी ठेवली होते. मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी नर्सरीत प्रवेश करत ऑफीसचे शटर उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील बी बियाने, रोख रक्कम असा एकूण एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला.  सकाळी लेंडे हे नर्सरीत आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सिसिटीव्ही कॅमेरे चेक केले असता चोरट्यांनी शटर उचकटून दोघे जणांनी आत मध्ये प्रवेश केला तर काही जण बाहेर थांबल्याचे त्यांना त्यात दिसले.       याप्रकरणी संदीप लेंडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकाॅन्सटेबल आदिनाथ गांधले हे करत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी