शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

एमपीएससी परीक्षेत जिल्ह्यातील या तरुणांनी रोवला यशाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 11:19 IST

अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात नगर जिल्ह्यातून अनेकांची अधिकारीपदी वर्णी लागली. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील प्रतीक्षा भुते व सोनई येथील दादासाहेब दराडे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली, तर श्रीगोंद्याची कन्या प्रतीक्षाखेतमाळीस हिने  पोलीस उपअधीक्षकपदी बाजी मारली. याशिवाय शिर्डीतून विनायक कोते, जामखेडमधून अक्षय रासने, पारनेरमधून तुषार शिंदे यांची तहसीलदारपदी निवड झाली. शिर्डीचेच सुरज कुमावत यांना नायब तहसीलदारपदी संधी मिळाली.

अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात नगर जिल्ह्यातून अनेकांची अधिकारीपदी वर्णी लागली. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील प्रतीक्षा भुते व सोनई येथील दादासाहेब दराडे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली, तर श्रीगोंद्याची कन्या प्रतीक्षाखेतमाळीस हिने  पोलीस उपअधीक्षकपदी बाजी मारली. याशिवाय शिर्डीतून विनायक कोते, जामखेडमधून अक्षय रासने, पारनेरमधून तुषार शिंदे यांची तहसीलदारपदी निवड झाली. शिर्डीचेच सुरज कुमावत यांना नायब तहसीलदारपदी संधी मिळाली.

नेवासा तालुक्यातील वंजारवाडी (सोनई) येथील दादासाहेब सुखदेव दराडे यांची उपजिल्हाधिकारी पदावर राज्यात चौथ्या क्रमांकाने निवड झाली. यापूर्वी ते राज्य उत्पादन शुल्क विभागात उपअधीक्षक पदावर मुंबई येथे कार्यरत होते. अभियंता पदवीधर असलेल्या दराडे यांनी शेतकरी कुटुंबातून अतिशय मेहनतीने हे यश संपादन केले. त्यांचे आतेभाऊ उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ व उपअधीक्षक (भूमी अभिलेख) अविनाश मिसाळ यांचे दराडे यांना मार्गदर्शन लाभले. 

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील प्रतीक्षा पोपटराव भुते यांनी मुलींमध्ये आर्थिक व सामाजिक मागास वर्गातून राज्यात दुसºया क्रमांकाने यश मिळवत उपजिल्हाधिकारीपद गाठले. सध्या त्या सांगली विभागात सहाय्यक विक्रीकर आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. खर्डा येथीलच अक्षय संतोष रासने यांचीही तहसीलदारपदी निवड झाली. खर्डा शहरातून दोन युवकांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. शिर्डी येथील विनायक कोते यांची तहसीलदार, तर सुरज कुमावत यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली.

विनायक कोते यांनी २०११ मध्ये बायो टेक्नोलॉजीमध्ये पदवी घेतली़ २०१७ मध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन नगरपालिका मुख्याधिकारी पद पटकावले़ सध्या ते धुळे महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत़ सुरज कुमावत (परदेशी) यांनी २०१४ मध्ये आयटी इंजिनिअरिंग केले़ या परीक्षेत दुसºया प्रयत्नात त्यांनी नायब तहसीलदार पदी बाजी मारली. 

पारनेर तालुक्यातील अळकुटी रस्त्यावरील बहिरोबावाडी येथील तुषार निवृत्ती शिंदे यांची तहसीलदारपदी वर्णी लागली. ते सध्या चंद्रपूर नगरपरिषदेत प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील स्नेहा सुरेश क्षीरसागर हिची तहसीलदारपदी निवड झाली. -----आता आयपीएसचे ध्येय...श्रीगोंदा येथील शेतकरी नामदेव खेतमाळीस यांची कन्या प्रतीक्षा हिने या परीक्षेत बाजी मारून पोलीस उपअधीक्षक होण्याचे स्वप्न साकार केले. प्रतीक्षाचे वडील शेतकरी, तर आई मिराबाई अंगणवाडी पर्यवेक्षिका आहेत. प्रतीक्षाने पुण्यातून बीएससी अ‍ॅग्रीची पदवी संपादन केली. २०१६ पासून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. २०१९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा तिने उत्तीर्ण केली होती. परंतु याहीपेक्षा वरच्या पदावर जाण्याचा तिचा ठाम निश्चय होता आणि अखेर कठोर मेहनतीने तिने यशाला गवसणी घातली. आता आपले ध्येय आयपीएस होण्याचे असल्याचे तिने सांगितले.---मढेवडगावच्या शिंदे बंधुंची धडाकेबाज कामगिरी; एक उपजिल्हाधिकारी, तर दुसरा नायब तहसीलदारश्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील शिंदे बंधुंनी स्पर्धा परीक्षेत जलवा दाखवला. मोठा भाऊ अजय दत्तात्रय शिंदे याने उपजिल्हाधिकारीपदी, तर लहान भाऊ नरेंद्र शिंदे याने नायब तहसीलदारपदाला गवसणी घातली. त्यांचे वडील दत्तात्रय शिंदे हे अभियंता असून आई सुजाता या गृहिणी आहेत. आई-वडिलांनी सुरुवातीपासून मुलांना अधिकारी बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. अजय हा गेल्या वर्षी सहायक विक्रीकर परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. अजयची उपजिल्हाधिकारी, तर नरेंद्रची नायब तहसीलदारपदी वर्णी लागल्याने दोघांचेही कौतुक होत आहे.