शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

दाळमंडई फौंडेशन लावणार शहरात दोन हजार झाडे

By admin | Updated: June 16, 2016 23:59 IST

अहमदनगर : लोकसहभागातून वृक्षसंवर्धनाची चळवळ राबविण्याचे ‘लोकमत’ने जाहीर केल्यानंतर या ग्रीन चळवळीचे जिल्हाभरातून स्वागत झाले.

अहमदनगर : लोकसहभागातून वृक्षसंवर्धनाची चळवळ राबविण्याचे ‘लोकमत’ने जाहीर केल्यानंतर या ग्रीन चळवळीचे जिल्हाभरातून स्वागत झाले. नगर येथील दाळमंडई फौंडेशन ट्रस्टने नगर शहरातील विविध भागात दोन हजार झाडे लावण्याचा व ते संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी त्यांनी जागाही निवडल्या आहेत. ‘ग्रीन अहमदनगर’ चळवळीत आम्हाला सहभागी व्हायचे आहे, असे असंख्य दूरध्वनी आज ‘लोकमत’ कार्यालयात खणखणले. शहरातील वाढती लोकसंख्या व वाढत्या वाहनांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. झाडांची संख्या घटल्यामुळे धुळीने व्यापलेले शहर अशी नगर शहराची ओळख बनली आहे. यावर मात करीत नगरला ‘ग्रीन सिटी’चा दर्जा मिळवून देण्यासाठी ‘लोकमत’ने लोकसहभागातून ‘माय सिटी-माय ट्री’ हे अभियान हाती घेतले आहे. याच अभियानांतर्गत नागरिकांना झाडे लावण्याचे व ते जगविण्याचे आवाहन ‘लोकमत’ने गुरुवारी केले. या अभियानाचे शहरासह जिल्ह्यातूनही स्वागत झाले. व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप, फेसबुकवरही या उपक्रमाचे स्वागत झाले.‘ग्रीन अहमदनगर’साठी दाळमंडई फौंडेशन ट्रस्टने उत्स्फूर्तपणे पुढाकार घेतला आहे. फौंडेशनचे अध्यक्ष संजय ताथेड, उपाध्यक्ष सुधीर मुनोत, सचिव अनिल अनेचा, प्रकल्प संचालक विनोद बोथरा यांनी ‘लोकमत’शी थेट संपर्क करून ‘ग्रीन अहमदनगर’ अभियानात आम्ही सहभागी होणार असल्याचे सांगितले. या अभियानाद्वारे दोन हजार झाडे लावण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. तसे लेखी पत्रही त्यांनी ‘लोकमत’ला दिले आहे. पहिल्या टप्प्यात ते सातशे झाडे लावणार आहेत. त्याच्या जागा आणि रोपांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. तसेच शहरातील शाळांमध्ये झाडे लावण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. त्यासाठी शाळांनी जागा उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी फौंडेशनचे संचालक देवकिसन मणियार, पप्पुशेठ मुंदडा, नितीन चंगेडिया, संतोष पिपाडा, आशिष खंडेलवाल, अमित मुथ्था, सतीश काकाणी, राजू शेटिया, किशोर डागा, प्रशांत मुथ्था, राजेंद्र मुनोत, संजय लुंकड, सूरज कोठारी, बजरंग दरक आदी उपस्थित होते. या फौंडेशनने यापूर्वी दुष्काळी गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करुन आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे. (प्रतिनिधी)पहिल्या टप्प्यात सातशे झाडेदाळमंडई फौंडेशनने श्री. रामकृष्ण एज्युकेशन फौंडेशन शाळा भवानीनगर येथे ( ५० रोपे), देऊळगाव सिद्धी (२०० रोपे), वडगाव तांदळी (२०० रोपे), नवजीवन कॉलनीतील ओपन स्पेस (७० रोपे), जैन पार्क, पुनममोतीनगर (५० रोपे), नंदनवन कॉलनी, बुरुडगाव रोड( ५० रोपे), कराचीवाला नगर (५० रोपे) अशी एकूण ६७० झाडे पहिल्या टप्प्यात लावण्याची जबाबदारी घेतली आहे. तसा लेखी प्रस्ताव त्यांनी आज ‘लोकमत’कडे सादर केला. सहभागासाठी संपर्क ग्रीन अभियानात सहभागी होण्यासाठी लोकमत कार्यालयात ९१७५५७५७५५ या भ्रमणध्वनीवर अथवा ०२४१-२४२९९०२, २४२९७११ या क्रमांकावर संपर्क साधावा. लोकमत कार्यालयात आपण प्रत्यक्ष भेट देऊनही या अभियानात काही जबाबदारी घेऊ शकता.