शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

पाथर्डीत लॉगबुकवर सह्याच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:33 IST

तालुक्यातील दुष्काळी भागाला शासनाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत टँकरने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळली आहे.

हरिहर गर्जेपाथर्डी : तालुक्यातील दुष्काळी भागाला शासनाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत टँकरने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळली आहे.धामणगाव येथे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठा करणाºया एम. एच १२ ए. यू.४६९९ या टँकरची तपासणी केली असता चालक रमजान फकीर यांच्याकडे पाणी वाटपासंदर्भातील नोंदीचे लॉगबुक आढळून आले नाही. त्याचेकडे लॉगबुकची मागणी केली असता त्याने दुसरा टँकर क्रमांक एम.एच.१६ बी.३०७ याचे लॉगबुक दाखवले. त्यात ३० एप्रिलपर्यंत टँॅकर खाली होण्याची वेळ, खेपेचे अंतर, पाणीपुरवठा व स्वछता महिला समितीच्या सदस्य, ग्रामसेवक, मुख्याध्यापक यांच्या सह्यांचे रकाने कोरे असल्याचे दिसून आले. संबंधित गाडीच्या लॉगबुकबाबत विचारणा केली असता ते ग्रामसेवकांकडे सही करायला दिल्याचे चालकाने सांगितले.जी.पी.एस. यंत्रणा आढळून उघड्या वायरच्या जाळ्यात असून त्याची पिन काढून ठेवण्याची सुविधा करण्यात आल्याचे दिसून आले. धामणगाव येथील महिलांना विचारणा केली असता त्यांनी १५ दिवसांतून एकदा अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असून आजपर्यंत कोणीही त्यांची लॉगबुकवर सही घेतली नसल्याचे सांगितले.पाण्यासाठी कायपण!मोहटे गावात आठ दिवसांनी अपुºया प्रमाणात पाणी पुरवठा होत असून पाणी विहिरीत सोडण्यात आले. त्यामुळे पाणी भरण्यासाठी येथे एकच जीवघेणी गर्दी झालेली दिसली. महिला, पुरूष, लहान मुले, वृद्ध मिळेल ते भांडे घेऊन पाणी पदरात पाडून घेत होते. काही तरूण विहिरीच्या कठड्यावर उभे राहून पाणी शेंदत होते. गर्दीतील एखाद्याचा हलकासा धक्का बसला तर संबंधित तरूणाच्या जीविताला धोका निर्माण होणार होता.फुंदे टाकळी येथेही अशीच अनियमितता होती. आठ दिवसांपूर्वी येथे खासगी विहिरीत पाणी सोडताना टँकर चालक आढळल्याने याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. येथील टँकरच्या लॉगबुकवर प्रत्येक फेरीला गावातील वेगवेगळ्या व्यक्तीच्या सह्या घेतल्या जात असल्याने मागील खेपेला कधी पाणी वाटप झाले याबाबत माहिती नागरिकापासून दडवली जात असल्याचे ग्रामस्थ दादासाहेब फुंदे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी