शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शंभर कॅबिनेट झाल्या तरी धनगर समाजाला आरक्षण नाही - सुप्रिया सुळे

By admin | Updated: May 31, 2017 16:07 IST

भाजपा सरकारने आरक्षणाचे गाजर दाखवून सत्ता मिळवली मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारने अभ्यासाचे कारण देत आरक्षणाला टाळाटाळ केली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर/ जामखेड, दि. 31 - धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला होता. भाजपा सरकारने आरक्षणाचे गाजर दाखवून सत्ता मिळवली मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारने अभ्यासाचे कारण देत आरक्षणाला टाळाटाळ केली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 
 
बारामतीत येऊन पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री  म्हणाले होते. परंतु त्यानंतर  शंभर कॅबिनेट झाल्या तरी आरक्षणाचा  निर्णय झाला नाही, असे सांगत ""सरकार कसला अभ्यास करतेय हे माहीत नाही"", असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला हाणला आहे. 
 
सुप्रिया सुळे यांनी चोंडी येथे येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे दर्शन घेऊन नक्षत्र उद्यानाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आण्णासाहेब डांगे यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी आश्रमशाळा येथे  पत्रकार परिषदेत घेतली. तेथे त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. परदेशातून आल्यानंतर दत्तू भोकनळ या खेळाडूंनी अवघ्या सहा दिवसात अभ्यास करून ६० टक्के मार्क मिळवले मात्र हे सरकार तीन वर्षांपासून अभ्यास करतेय तरी त्यांना निर्णय घेता येत नाही. यावरून हे सरकार किती "ढ" आहे याची प्रचिती येते, असेही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. 
 
सरकारचे अपयश झाकण्यासाठी शिवार संवाद यात्रा सुरू केली आहे. या सरकारच्या काळात सर्वाधिक आत्महत्या झाल्या मात्र सरकार शेतकऱ्यांना हमी भाव देण्याऐवजी जाहिरातींवर खर्च करीत आहे. जाहीरात खर्च कमी केल्यास शेतकऱ्यांना हमी भाव देणे शक्य होईल, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला.  
 
आघाडी सरकारने अहिल्यादेवीचे जन्मगाव चोंडी येथे विकासासाठी तेरा कोटीचा निधी देऊन पर्यटन स्थळाचा दर्जा दिला. येथे संशोधनासाठी बाहेरून लोक येतात. त्यासाठी अद्यावत ग्रंथालय सुरू करण्याबाबत माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांना सूचना दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, महीला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले आदी उपस्थित होते.