शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
4
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
5
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
6
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
7
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
8
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
9
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
10
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
11
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
12
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
13
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
14
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
15
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
16
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
17
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
18
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
19
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
20
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी

जाण्याची सोय नाही..राहण्याचीही सोय नाही...प्रशासन ढिम्म, तारकपूर बसस्थानकात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 16:01 IST

अहमदनगर : परप्रांतात एस.टी. बसेस बंद झाल्याने एक हजारांच्यावर परप्रांतीय नागरिक अहमदनगरमध्ये अडकले आहेत. त्यातील काही नागरिक, मजूरांनी तारकपूर बसस्थानक परिसरात ठाण मांडले. राहण्याची किंवा जाण्याची तरी सोय करा, अशी ते विनवणी करीत आहेत. मात्र बाराशे लोक झाल्याशिवाय रेल्वेची व्यवस्था करणे शक्य नसल्याने या परप्रांतीय नागरिकांचे नगरमध्ये हाल सुरू झाले आहेत. 

अहमदनगर : परप्रांतात एस.टी. बसेस बंद झाल्याने एक हजारांच्यावर परप्रांतीय नागरिक अहमदनगरमध्ये अडकले आहेत. त्यातील काही नागरिक, मजूरांनी तारकपूर बसस्थानक परिसरात ठाण मांडले. राहण्याची किंवा जाण्याची तरी सोय करा, अशी ते विनवणी करीत आहेत. मात्र बाराशे लोक झाल्याशिवाय रेल्वेची व्यवस्था करणे शक्य नसल्याने या परप्रांतीय नागरिकांचे नगरमध्ये हाल सुरू झाले आहेत. आजपर्यंत एस. टी. महामंडळाच्या बसेसद्वारे तसेच रेल्वेद्वारे परप्रांतीय नागरिकांची त्यांच्या राज्यात जाण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र आजही अनेक परप्रांतीय नागरिक अडकलेले आहेत. सुपा, बोल्हेगाव, नागापूर, नेवासा, तसेच जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहुन तब्बल एक हजार नागरिक नगरमध्ये दाखल झालेले आहेत. त्यातील अनेक नागरिक गुरुवारी तारकपूर बसस्थानक परिसरात जमा झाले होते. स्नेहालयातर्फे त्यांना तेथे नाश्ता, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, अशी आर्त हाक ते देत आहेत. मात्र प्रशासनाने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. अशा नागरिकांची नगर शहरात गर्दी वाढली तर नगरला आणखी कोरोनाचा धोका होऊ शकतो, अशी सध्याची परिस्थिती आहे.दरम्यान सर्व नागरिकांची व्यवस्था महापालिकेने करावी. त्यांना भोजन, चहा, नाश्ता देण्याची आम्ही व्यवस्था करू, असे स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले. मात्र महापालिकेकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. निवारा केंद्रात गर्दी झाली आहे. तेथे जागा नाही. त्यामुळे त्यांची सध्या राहण्याची व्यवस्था करू शकत नसल्याची हतबलता महापालिकेने व्यक्त केली. अ‍ॅड. श्याम असावा यांनी सर्व नागरिकांना प्रशासकीय पूर्तता करून पाठविण्याची व्यवस्था करू, असे आश्वासन नागरिकांना भेटून दिले.परप्रांतीय नागरिक दिवसभर तारकपूर बसस्थानकात होतो. सायंकाळी सहानंतर तारकपूर स्थानक बंद होणार आहे. नागरिकांनी बसस्थानकाच्या बाहेर जावे, असे फर्मान एस.टी. चे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे या नागरिकांचा सहानंतर कुठे जायचे? हाच खरा प्रश्न आहे.