शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात टंचाईच्या झळा, दोन तालुक्यांत टँकर सुरू

By चंद्रकांत शेळके | Updated: April 18, 2023 15:52 IST

मागील आठवड्यातील अवकाळी पावसानंतर आता तीव्र उन्हाचा चटका जा‌णवू लागला.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर: मागील आठवड्यातील अवकाळी पावसानंतर आता तीव्र उन्हाचा चटका जा‌णवू लागला असून जिल्ह्यात संगमनेर व अकोले तालुक्यात दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाली आहे. अजून उन्हाळ्याचे अडिच महिने बाकी असल्याने टँकरची संख्या वाढणार आहे. 

यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाई कृती आराखडा तयार करून त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेतली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात यंदा ३२१ गावे आणि १ हजार ३९ वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई जाणवू शकते. यासाठी ७ कोटी ३७ लाखांची तरतूदही करण्यात आली आहे. यात टँकरसाठी साडेसहा कोटी, तर विहिरी अधिग्रहणासाठी ८१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

त्यानुसार आता जिल्ह्यात पहिला टँकर अकोले तालुक्यातील ५ वाड्यांना व नंतर संगमनेर तालुक्यातील एका गावात सुरू करण्यात आला आहे. अकोल्यातील ५ वाड्यांना साडेतीन, तर संगमनेरमधील एका गावाला १ अशा साडेचार खेपा रोज शासकीय टँकरने केल्या जात आहेत. यात संगमनेर तालुक्यातील ९२२, तर अकोले तालुक्यातील १७१० अशा एकूण २६३२ लोकांना टँकरने पाणीपुरवठ होत आहे. ७.३७ कोटींचा आराखडा मंजूर

यंदा जिल्हा परिषदेने ७ कोटी ३७ लाख ५२ हजार खर्चाचा टंचाई आराखडा तयार केला आहे. यात खासगी विहिरी अधिग्रहण करण्यासाठी ८१ लाख ४५ हजार, टँकर भरण्यासाठी २१ लाख २३ हजार, टँकरद्वारे, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ६ कोटी ३२ लाख, नळ योजना विशेष दुरुस्तीसाठी २ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Waterपाणी