काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हानिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. या बैठकादरम्यान काही ठिकाणी पदाधिकारी निवडीचे वादही त्यांच्यासमोर आले आहेत. महसूलमंत्री थोरात म्हणाले, ‘अहमदनगर जिल्हा हा माझा जिल्हा असल्याने काही जण बातम्या देण्याचा प्रयत्न करतात. राज्याच्या बाबतीत नेतृत्व पटोले यांच्याकडे असले तरीही अनेक निर्णय एकत्र बसून विचारांनी होतात.’ गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत थोरात म्हणाले, ‘बातम्या येणे आणि वस्तुस्थिती यात मोठा फरक असतो. पोलीस दलात जे घडले, त्यात चुका असतील तर शिक्षा होईल, हेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. गृहमंत्र्यांचे काम चांगले असून, प्रामाणिक काम करणारे त्यांचे नेतृत्व आहे. गृहमंत्री सक्षम आहेत, असे माझे वैयक्तिक मत आहे. गृहमंत्री बदलाच्या बातम्यांमध्ये कुठलेही तथ्य नाही.’
-----------