शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

थेरवडी तलावाने गाठला तळ

By admin | Updated: June 28, 2014 01:12 IST

कर्जत : कर्जत-राशीन या दोन शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या थेरवडी तलावासह बारा तलावांच्या परिसरातील वीज पुरवठा तात्काळ खंडित करावा, असे तहसीलदारांचे आदेश

कर्जत : कर्जत-राशीन या दोन शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या थेरवडी तलावासह बारा तलावांच्या परिसरातील वीज पुरवठा तात्काळ खंडित करावा, असे तहसीलदारांचे आदेश असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत दुर्लक्ष केले. यामुळे भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.यावर्षी लांबलेला पाऊस पाहता कर्जतचे तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी थेरवडी दूरगाव तलावालगतचे सर्व कनेक्शन तोडून वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची पर्वा न करता जोमाने पाणी उपसा केला व ते पाणी पिकांना दिले यामुळे थेरवडी दूरगाव तलावासह सर्वच तलावांनी तळ गाठला आहे. यामुळे पाणी टंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. दूरगाव व थेरवडी तलावात कुकडीचे पाणी सोडणे गरजेचे आहे. मागणी करूनही प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. लोकसभा निवडणूक काळात मागणी नसतानाही मतांवर डोळा ठेवून कुकडीला पाणी सोडले होते. थेरवडी तलावावर ५० ते ६० हजार लोक पाण्यासाठी अवलंबून आहेत. तर दूरगाव तलावावर टँकर भरले जातात किमान या दोन ठिकाणी कुकडीचे पाणी सोडणे गरजेचे आहे.कर्जत तालुका मोठ्या पाणी टंचाईशी दोन हात करत आहे. ३२ टँकरद्वारे ३० गावे व १२६ वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. आणखी ८ गावाला टँकर सुरू करावेत यासाठी प्रस्ताव शासन दरबारी पडून आहेत. कर्जत तालुका दुष्काळासाठी प्रसिद्ध आहे. मग तो टँकरचा असो किंवा पाण्याचा यामध्ये आता आणखी भर पडली आहे. गेल्या वर्षभरापासून येथील टंचाई विभाग अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. जून २०१३ पासून या विभागाला निधी प्राप्त झाला नाही. यामुळे ३ कोटी ४० लाख रुपयांची देणी थकली आहेत. या सर्वच बाबीकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.तालुक्यातील जनता पाणी टंचाईशी मुकाबला करत असताना तलावाच्या परिसरातील शेतकरी मात्र बिनधास्त आहेत. त्यांची पिके हिरवीगार होऊन डौलत आहेत. इकडे मात्र पाण्याची भांडी रिकामी आहेत हा विरोधाभास पहावयास मिळतो आहे. (तालुका प्रतिनिधी)