श्रीरामपूर : एका महिलेच्या पर्समधील ६ हजार रूपये रोख व सोन्याचे दागिने असा सुमारे पावणे दोन लाखांचा ऐवज श्रीरामपूर बसस्थानकातून लांबविला. ही महिला बसमध्ये चढत असताना हा प्रकार घडला. शुक्रवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली. तिने आरडाओरडा केला. पण चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. ललिता अंकुश आव्हाड (रा. संकल्प कॉलनी, बुºहाणनगर, अहमदनगर) या श्रीरामपूरला पाहुण्यांकडे आल्या होत्या. कार्यक्रम आटोपल्यानंतर नगरला जाण्यासाठी श्रीरामपूर-पुणे बसमध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत बॅगेतील पर्समध्ये असलेले ६ तोळे सोन्याचे दागिने व ६ हजार रूपये रोख असा सुमारे १ लाख ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला. आव्हाड यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. हेडकाँस्टेबल पितळे तपास करीत आहेत. बसस्थानकात लग्नसराई व उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांची गर्दी असते. बॅगा, पर्स, पाकिट चोरणारे चोरटे स्थानकात भटकत चोर्या करीत असतात. स्थानकात पोलीस चौकी सुरू करावी,अन्यथा बंदोबस्तासाठी पोलीस तैनात करावा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. (वार्ताहर)
पावणेदोन लाखांची चोरी
By admin | Updated: March 18, 2024 16:15 IST