शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गावगाड्याचे वास्तव मांडणाऱ्यांसाठी पुरस्काराचे मोल खूप मोठे

By सचिन धर्मापुरीकर | Updated: December 7, 2023 17:25 IST

लोककवी प्रशांत मोरे : भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्काराचे वितरण.

सचिन धर्मापुरीकर,कोपरगाव : राज्यस्तरीय भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार म्हणजे ३५ वर्षांची महायात्रा आहे. अख्या जगाचा पोशिंदा असलेला आणि आज हवालदिल झालेला शेतकरी-शेतमजूर, नांगरणी, पेरणी, खुरपणी, पशु-पक्षी एकूणच कृषी-संस्कृती आणि गावगाड्याचे वास्तव चित्रण करणाऱ्या कवी, कथाकार आदी साहित्यिकांना दिला जाणाऱ्या या पुरस्काराचे मोल आणि महत्त्व खूप मोठे आहे. असे प्रतिपादन लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांनी येथे केले. कोपरगाव येथील के. जे. सोमैया महाविद्यालयात भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते.

अशोकराव रोहमारे म्हणाले की, आजपर्यंत या पुरस्काराने १७० पेक्षा अधिक ग्रामीण नवसाहित्यिकांना या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. कै. के. बी. रोहमारे यांनी लावलेले हे रोप जपण्याचे काम आम्ही आजतागायत करीत आहोत.

कार्यक्रमास उपस्थित साहित्यिक प्रशांत आंबरे म्हणाले की, के.बी. रोहमारे आणि त्यांचे कर्तुत्व यावर प्रकाश टाकला. पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी केले. प्रास्ताविक सहकार्यवाह प्रा. जिभाऊ मोरे यांनी केले. परीक्षकांच्या वतीने प्रा. लक्ष्मण महाडिक, प्राचार्य भीमराव वाकचौरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे व प्रा. वर्षा आहेर यांनी केले.

पूरस्कार प्राप्त साहित्यिक आणि साहित्य :

नागू विरकर यांना हेडाम या ग्रामीण कादंबरीसाठी, गणपत जाधव यांना हावळा या ग्रामीण कथासंग्रहासाठी विभागून, आप्पासाहेब खोत यांना काळीज विकल्याची गोष्ट, मनीषा पाटील हरोलीकर यांना नाती वांझ होताना या ग्रामीण कवितासंग्रहासाठी विभागून, प्रविण पवार यांना भुई आणि बाई या ग्रामीण कवितासंग्रहासाठी विभागून, डॉ.रवींद्र कानडजे यांना शेतकरी जीवनसंघर्ष : ऐतिहासिक परामर्श या ग्रामीण समीक्षेसाठी विभागून, डॉ. मारुती घुगे यांना १९८० पूर्वीची ग्रामीण कविता : प्रेरणा आणि प्रवृत्ती प्रवृत्ती या समीक्षेसाठी विभागून, पुरस्कार देण्यात आला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर