शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक फेल झाले अन् वाहन विहिरीत कोसळले, एकाचा मृत्यू 

By सुदाम देशमुख | Updated: April 8, 2023 12:00 IST

ही घटना शुक्रवारी रात्री  घडली. यात चालकाशेजारी बसलेल्या मदतनीसाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. 

अहमदनगर : कोपरगाव  तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गावरील सर्व्हिस रस्त्याने जाणारी मालवाहतूक पिकअप (एम एच १७ ए जे ५८३६ ) वाहनाचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे वाहन रस्त्याच्याकडेला असलेल्या विहिरीत कोसळले. ही घटना शुक्रवारी रात्री  घडली. यात चालकाशेजारी बसलेल्या मदतनीसाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. 

गाडीचा ब्रेक फेल झाल्याची बाब चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने वाहनातून उडी मारली. मात्र त्याचा मदतनीस गाडीत होता. घटना स्थळी पोलीस दाखल झाले. वाहन विहिरीतून काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.

कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर हा अपघात झाला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. समृद्धी महामार्गाची रेस्क्यू टीम,महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल, अग्निशामक दल, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी -कर्मचारी,आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना पाचारण करून गाडी विहिरीतुन काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. 

रात्री १० वाजेच्या दरम्यान गाडी विहिरीतून बाहेर काढली.  मात्र मदतनीसाला बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम सुरू होते. अखेर रात्री उशिरा वीस वर्षीय मदतनिसाचा मृतदेह विहिरीत सापडला.चालकाला संत जनार्दन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघात