शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

"ते मंत्री राज्याचे की, दोन-तीन तालुक्यांचे", बाळासाहेब थोरातांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा

By शेखर पानसरे | Updated: December 24, 2022 19:41 IST

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना अतिथीगृहात शनिवारी (दि.२४) संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

संगमनेर : सततच्या विकासकामातून आणि सुसंस्कृत राजकारणातून संगमनेर तालुक्याचा झालेला विकास काहींना पाहवत नाही, त्यामुळे त्यांचे त्रास देण्याचे काम सुरू आहे. ते मंत्री राज्याचे आहेत की, दोन-तीन तालुक्यांचे आहेत. हेच कळत नाही. सत्ता येते आणि जाते. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एका दिवसात सर्व चित्र बदलेल, अशी टीका माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी करत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना अतिथीगृहात शनिवारी (दि.२४) संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती शंकरराव खेमनर, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सीताराम राऊत, रामहरी कातोरे, संपत डोंगरे, रामदास वाघ, मिलिंद कानवडे, नानासाहेब शिंदे, चंद्रकांत कडलग, गणपतराव सांगळे, सुरेश थोरात, सोमेश्वर दिवटे, सुभाष सांगळे, पद्मा थोरात, संपत गोडगे आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, आपण सर्वांना बरोबर घेत तालुक्याच्या विकासाची घोडदौड कायम राखली आहे.  विकास कामातील सातत्य, सुसंस्कृत राजकारण, समाजकारण, प्रगती यामुळे राज्यात संगमनेर तालुका आदर्शवत ठरला आहे. मात्र, हा संगमनेरचा विकास काहींना पाहवत नसल्याने त्यांचा त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असून अशा काळात सर्वांनी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. कितीही अडचणी आल्या तरी संगमनेर तालुक्याची विकासाची वाटचाल सुरूच राहणार आहे.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील