अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (पुणे) जुलैमध्ये घेतलेल्या दहावी पुनर्परिक्षार्थी परीक्षेत पुणे विभागात नगर जिल्हा अव्वल ठरला आहे. नगरचा निकाल ४१.९८ टक्के लागला, तर पुणे (२७.०५ टक्के) व सोलापूर (२८.८५ टक्के) पिछाडीवर राहिले.मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते, त्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून शिक्षण मंडळाने जुलैमध्ये परीक्षा घेतली. त्याचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. पुणे विभागात येणाऱ्या पुणे, सोलापूर व नगर या जिल्ह्यांमध्ये नगरने बाजी मारली. नगर जिल्ह्यातून या परीक्षेला ४६५९ विद्यार्थी बसले होते, त्यातील १९५६ विद्यार्थी (४१.९८ टक्के) उत्तीर्ण झाले. १६ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सप्टेंबरमध्ये लगेच अकरावीला प्रवेश मिळणार आहे. (प्रतिनिधी)
दहावी पुनर्परीक्षेत नगरचा टक्का वाढला
By admin | Updated: August 31, 2016 00:33 IST