शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
8
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
9
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
10
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
11
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
12
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
13
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
14
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
15
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
16
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
17
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
18
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
19
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
20
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ

निविदाधारकांचा ठेंगा

By admin | Updated: July 10, 2014 00:35 IST

पारनेर : राज्य बँकेने पारनेर साखर कारखाना विक्रीसाठी निविदा काढल्यानंतर कोणीच निविदा भरली नसल्याने पारनेर कारखाना विक्रीचा राज्य बँकेचा निर्णय फसला होता.

पारनेर : राज्य बँकेने पारनेर साखर कारखाना विक्रीसाठी निविदा काढल्यानंतर कोणीच निविदा भरली नसल्याने पारनेर कारखाना विक्रीचा राज्य बँकेचा निर्णय फसला होता. आता पुन्हा विक्रीची फेरनिविदा बँकेने काढली असून १७ जुलैला विक्री होणार आहे. परंतु दुसऱ्या निविदेलाही ठेंगा देत अद्याप कोणीही विक्री निविदेत सहभागी झाले नाहीत. दरम्यान, उदय शेळके यांनी वसुली न्यायप्राधिकरणाकडे केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.पारनेर साखर कारखाना विक्री करण्याचा निर्णय राज्य बँकेने घेतला होता व त्याची निविदाही प्रसिध्द केली होती. याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आमदार विजय औटी, कामगार नेते आनंद वायकर व शेतकऱ्यांच्यावतीने सुभाष बेलोटे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विक्री विरोधात याचिका दाखल केली होती. तर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष उदय शेळके यांनी वसुली न्यायप्राधिकरणाकडे दाद मागितली होती, मात्र विक्रीसाठी कोणतीच निविदा आली नसल्याचे राज्य बँकेने न्यायालयात सांगितल्यानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली होती. पुन्हा निविदा काढल्यानंतर न्यायालयात दाद मागता येईल, असे न्यायालयाने सांगितले होते.१७ जुलैला निविदा उघडणारपारनेर कारखाना विक्रीसाठी राज्य बँकेने पुन्हा निविदा प्रसिध्द केली आहे. यामध्ये बँकेने ऐंशी कोटींचेच कर्ज दाखवले आहे. पंधरा जुलैपर्यंत निविदा दाखल करण्यास सांगितले असून १७ जुलै रोजी निविदा उघडण्यात येणार आहे. विक्रीमध्ये पारनेर साखर कारखान्यातील यंत्रसामुग्रीसह सुमारे ४७ हेक्टर जमिनीचाही समावेश आहे.विक्रीसाठी निरुत्साहबँकेने निविदा काढल्यानंतर आतापर्यंत कोणीही विक्रीसाठी निविदा भरण्यास पुढे आले नसल्याची माहिती आहे. निविदा भरण्यास आणखी आठवड्याचा कालावधी असल्याने यात कोण सहभागी होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. विक्री निविदा प्रसिध्द केल्यानंतर त्यात कर्जाची रक्कम वाढीव असल्याने व नंतर कारखाना विकत घेतल्यावर कामगार व इतर देणी लिलाव घेणाऱ्याने द्यायची असल्याने सगळाच बोजा लिलावधारकावर पडत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. जाधव यांचा संशयदरम्यान, निविदा भरताना कोणी आले नाही असे दाखवायचे व नंतर कमी भावात कारखाना विकायचा असा डाव असू शकतो, असा संशय कारखान्याचे माजी संचालक शिवाजी जाधव यांनी व्यक्त केला आहे. नव्याने सुनावणीजिल्हा बँकेचे उपाध्यक्ष उदय शेळके यांनी वसुली न्यायप्राधिकरणाकडे याचिका दाखल केल्यानंतर त्यावर दोनदा सुनावणी झाली. आता पुन्हा नव्याने सुनावणी होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)सर्वपक्षीय बैठकपारनेर साखर कारखाना बाचविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या पध्दतीने दोन ते तीन दिवसात बैठकीचा निर्णय घेऊ.शिवाजी जाधव, माजी संचालक, पारनेर कारखानाकामगार अस्वस्थपारनेर विक्री प्रक्रियेत अजून कोणीही सहभागी झालेले नसले तरी नंतर राज्य बँक काय निर्णय घेणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे कामगारांमध्येही अस्वस्थता आहे. एकीकडे पाऊस नाही तर दुसरीकडे कारखानाही बंद राहिला तर अनेक कामगारांची कुटुंबे संकटात येण्याची शक्यता आहे.