शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: July 9, 2014 00:05 IST

अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी किसन उर्फ कृष्णा बारकू पानकर याला जिल्हा न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी दहा वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी किसन उर्फ कृष्णा बारकू पानकर (वय ४२, रा. दहिगावने, ता. शेवगाव) याला जिल्हा न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी दहा वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार ही शिक्षा झाली आहे.जानेवारी २०१३ मध्ये शेवटच्या आठवड्यात फिर्यादिची मतिमंद अल्पवयीन मुलगी (वय १४ वर्षे) ही नैसर्गिक विधीकरीता गेली असता तेथे आरोपीने शेळ््या चारीत असताना बोरे देतो म्हणून तिला ज्वारीच्या शेतात नेले. तिच्या भोळसर स्वभावाचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी अत्याचारित मुलीच्या आईने शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार सदर खटला नगरचे विशेष जिल्हा न्यायाधीश क्रमांक १ यांच्या न्यायालयात दाखल झाला होता. सरकारी पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये अत्याचारित मुलीचा जबाब व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे जबाब महत्त्वपूर्ण ठरले. सरकार पक्षातर्फे नगरचे सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता प्रकाश गायकवाड यांनी काम पाहिले. अत्याचारित मुलगी मानसिकदृष्ट्या दुर्बल असून तिच्या भोळसरपणाचा व आरोपीची स्वत:ची मुलगी तिच्या वर्गात शिकत असल्याचे माहिती असूनही आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. मुलीच्या असहायतेचा फायदा घेऊन अत्याचार केल्याचा वैद्यकीय पुरावाही सरकार पक्षाने सादर केला. सदरचा पुरावा ग्राह्य धरून आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दिली. तसेच लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ४ नुसार १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षाही सुनावली. (प्रतिनिधी)