शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक समितीसमोर बाजू मांडण्यास तहसीलदार देवरे यांचा नकार; राज्यस्तरीय समितीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 14:23 IST

अहमदनगर : स्थानिक चौकशी समितीवर प्रचंड दबाव असू शकतो. त्यामुळे या समितीसमोर मी माझी बाजू मांडणार नाही. चौकशीसाठी राज्यस्तरीय ...

अहमदनगर : स्थानिक चौकशी समितीवर प्रचंड दबाव असू शकतो. त्यामुळे या समितीसमोर मी माझी बाजू मांडणार नाही. चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती नियुक्त करण्यात यावी, अशी मागणी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माध्यमांशी बोलताना केली. देवरे यांची आत्महत्येचा इशारा देणारी ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर महिला आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे.  या चौकशी समितीची पहिली सुनावणी सोमवारी सकाळपासून सुरू झाली. या समितीमध्ये देवरे यांनाही पाचारण करण्यात आले होते.  देवरे या सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या. मात्र त्यांनी चौकशी समितीसमोर जाण्यास नकार दिला.  याबाबत माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या,  'मी याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची दुपारी भेट घेऊन त्यांच्याकडे राज्यस्तरीय समितीमार्फत याप्रकरणाची चौकशी व्हावी' अशी मागणी करणार आहे.  स्थानिक समितीवर दबाव असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या समितीसमोर मी माझे म्हणणे मांडणार नाही. 

दरम्यान, राज्यस्तरीय  तहसीलदार व नायब तहसीलदार  संघटनेनेही देवरे यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना स्वतंत्र निवेदन पाठवले आहे.  या निवेदनातही त्यांनी राज्यस्तरावर महिला सदस्याचा समावेश असलेली राज्यस्तरीय स्वतंत्र समिती असावी, अशी मागणी  केली आहे.