संगमनेर : शिक्षण क्षेत्रातील नवीन प्रवाहांचा सर्वांनी स्वीकार केला पाहिजे. शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यातील सुसंवाद वाढविणे गरजेचे आहे. कारण त्यातूनच पुढे जाण्यासाठी दिशा मिळते. शिक्षकांनी सामाजिक दृष्टीकोन स्वीकारून ज्ञानदानाचे आपले कार्य पुढे नेले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेच्यावतीने मंगळवारी (दि. २) आमदार डॉ. तांबे यांच्या अभीष्टचिंतन कार्यगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक बाजीराव खेमनर होते. यावेळी संस्थेचे सचिव लक्ष्मण कुटे, सहसचिव दत्तात्रय चासकर, खजिनदार तुळशीनाथ भोर, रजिस्ट्रार बी. आर. गवांदे, चंदकांत कडलग, प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे शिक्षणाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. गणेश गुंजाळ यांनी केले तर प्राचार्य मच्छींद्र दिघे यांनी आभार मानले.