शहरं
Join us  
Trending Stories
1
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
2
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
3
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
4
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
5
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
6
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
7
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
8
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
9
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
10
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
11
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
12
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
13
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
14
Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
15
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
16
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
17
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
18
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
19
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
20
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना वेतन मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:19 IST

संगमनेर : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, अघोषित, अंशत: विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना वेतन मिळण्याकरिता पाठपुरावा केला होता. या ...

संगमनेर : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, अघोषित, अंशत: विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना वेतन मिळण्याकरिता पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून, राज्य सरकारने त्यासाठी तातडीने निधी मंजूर केल्याने विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना वेतन मिळणार आहे, अशी माहिती आमदार डाॅ. सुधीर तांबे यांनी दिली.

डॉ. तांबे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावला आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, अंशत : विनाअनुदानित शाळांचा प्रश्‍न मिटावा, यासाठी मागील ४७ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षक संघटनांचे आंदोलन सुरु होते. महसूलमंत्री थोरात यांच्यामार्फत सातत्याने सरकारकडे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही पुरवणी मागणी मंजूर झाली. परंतु, शासनाने हा निधी वितरीत करण्याचा अध्यादेश काढला नव्हता. त्यावर शालेय शिक्षण व वित्त विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करुन विनाअनुदानित शाळांना २० टक्के व ज्या शाळांना २० टक्के अनुदान आहे, त्यांनी वाढीव २० टक्के म्हणजे ४० टक्के निधी वितरीत करण्याचा अध्यादेश मंजूर करून घेतला.

शिक्षण व्यवस्था ही समाज बदलण्याचे प्रभावी माध्यम आहे. ग्रामीण व आदिवासी भागात वाडीवस्तीवर अनेक शिक्षक वर्षानुवर्षे विनावेतन काम करत आहेत. त्यांची मागणी रास्त आहे. या निर्णयामुळे ६६ हजार शिक्षकांसमवेत त्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तेचा फायदा होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. यापुढेही अघोषित शाळांचा प्रश्‍न, पायाभूत वाढीव पदांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरु असून, हे सरकार सर्वसामांन्यासाठी चांगले निर्णय घेत आहे.