शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दिन विशेष : आंधळे गुरूजींचे भविष्य अंधकारमय , किराणा दुकान चालवून हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 12:39 IST

पळसपूरच्या दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातून पुढे येऊन बी़ए़,बी़एड. चे शिक्षण घेऊन २००७ पासून खडकवाडीच्या नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संजय आंधळे अवघ्या साडेतीन हजार रूपये दरमहा मानधनावर ज्ञानदानाचे काम करीत आहेत. अल्पमानधनामुळे आंधळे गुरूजींचे भविष्य अंधकारमय बनले आहे.

विनोद गोळेपारनेर : पळसपूरच्या दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातून पुढे येऊन बी.ए.,बी.एड. चे शिक्षण घेऊन २००७ पासून खडकवाडीच्या नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संजय आंधळे अवघ्या साडेतीन हजार रूपये दरमहा मानधनावर ज्ञानदानाचे काम करीत आहेत. अल्पमानधनामुळे आंधळे गुरूजींचे भविष्य अंधकारमय बनले आहे.पारनेर तालुक्यातील पळसपूर, पोखरी खडकवाडी, डोंगरवाडीसह अनेक गावे दुर्गम आहेत़ याच भागात शिक्षणाशिवाय पर्याय नाही, म्हणून आंधळे यांनी बी़ ए़ करून इतिहास व हिंदी विषयात बी़एड़ केले़ आंधळे यांनी बी़ए़,बी़एड केल्यानंतर शिक्षकाची नोकरी लागेल, म्हणून त्यांनी २००७ मध्ये खडकवाडी येथील नूतन विद्यालयात शिक्षक म्हणून काम सुरू केले. अकरावी, बारावीला शिक्षण देताना आपल्या शाळेस सरकार कधी तरी अनुदान देईल व आपण कायमस्वरूपी शिक्षक होऊ, या आशेवर ते अकरा वर्षे काम करीत आहेत. पहिल्या टप्प्यात नूतन विद्यालयाचे अकरावी व बारावीचे वर्ग नवीन सुरू झाल्याने व गाव ग्रामीण भागात असल्याने अल्पशा मानधनावर काम सुरू केले.नोकरी आहे म्हणून २०११ मध्ये विवाह झाल्यानंतर साडेतीन हजारांमध्ये संसाराचा खर्च पुरेना म्हणून मग संजय व पत्नी वर्षा यांनी पळसपूरमध्ये किराणा दुकान सुरू केले़ मांडवे गावातील शेतीकडेही लक्ष देऊन सुट्टीच्या काळात शेती व सकाळी सात ते दहा दुकान, दुपारी अकरा ते पाच शाळा व सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पुन्हा किराणा दुकान सांभाळणे असा शिक्षक गुरूजींचा नित्यक्रम आहे. दिवसभर त्यांच्या पत्नी किराणा दुकान सांभाळतात़ एवढ्या पगारात आम्ही काटकसरीने संसार चालवतोय, पण सरकारने शाळांना लवकर अनुदान द्यावे, असे संजय यांची पत्नी वर्षा आंधळे सांगत होत्या. साडेचार वर्षांच्या भक्ती या त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचाही खर्च आता आमच्या नियोजनात वाढणार आहे,असे शिक्षक आंधळे सांगत होते.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर