शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक करणार नाक्यावर वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:53 IST

अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने पारगमन शुल्क वसुलीसाठी सुमारे ८ ते ९ शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या प्रमुखांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत शिक्षक आणि त्यांच्या परिवारामध्ये संताप आहे.

अहमदनगर : अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने पारगमन शुल्क वसुलीसाठी सुमारे ८ ते ९ शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या प्रमुखांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत शिक्षक आणि त्यांच्या परिवारामध्ये संताप आहे.कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पारगमन शुल्क वसुलीसाठी नेमलेल्या ठेकेदाराची मुदत ३० एप्रिलला संपली. त्यानंतर शुल्क वसुलीसाठी प्रशासनाने नाक्यांचा ताबा घेतला. या नाक्यांवर वसुली कोणामार्फत करायची, असा प्रश्न प्रशासनासमोर होता. त्यासाठी कॅन्टोन्मेंट प्रशासनाने कार्यालयातील काही विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. परंतु पुरेसे मनुष्यबळ नसल्याने प्रशासनाने थेट शिक्षकांच्या नियुक्त्या पारगमन शुल्क वसुलीसाठी केल्या. सध्या शैक्षणिक वर्ष संपले असल्याने शाळांना सुट्टी आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेत प्रशासनाने शिक्षकांना पारगमन वसुलीसाठी रस्त्यावर उभे केले आहे. प्रशासकीय आदेशासमोर शिक्षकांचे काही चालले नसल्याने त्यांनीही नियुक्त्या निमूटपणे स्वीकारल्या. तोंडावर रुमाल बांधून शिक्षक वसुलीचे काम करत आहेत. भर उन्हात उभे राहून वसुली करावी लागत असल्याने काही शिक्षक आजारी पडले आहेत. काही शिक्षकांना रात्रपाळीच्याही नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षक तणावाखाली आहेत.दरम्यान, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. श्रीवास्तव यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला, मात्र तो होऊ शकला नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय