शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदारसंघ निवडणूक : नगर जिल्ह्यातील तीन उमेदवार मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 13:34 IST

नगरमधील नाशिक विभाग शिक्षक परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांना विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या जून २०१८ मध्ये होणाऱ्या निवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.

केडगाव : नगरमधील नाशिक विभाग शिक्षक परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांना विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या जून २०१८ मध्ये होणाऱ्या निवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे या निवडणुकीसाठी आता नगर जिल्ह्य तीन उमेदवार मैदानात उतरले आहेत.येत्या जून महिन्यात नाशिक विभाग शिक्षक मतदासंघाची निवडणूक होत आहे. टिडीएफकडून प्रा.भाऊसाहेब कचरे व माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव आप्पासाहेब शिंदे याआधीच रिंगणात उतरले आहेत. टिडिएफकडुन जिल्ह्यात एकच उमेदवार असावा यासाठी जिल्ह्यातील ५ इच्छुकांनी एकीचा सूर आवळला. मात्र हा फक्त देखावा असल्याचे नंतर जाहीर झाले असल्याने इच्छुकांच्या एकीचे नाटक सर्व मतदारांसमोर उघडे पडले. जिल्ह्यात शिक्षकांमध्ये एकजूट नसल्याने व गटातटाचे राजकारण या एकजुटीत मोठी अडचण असल्याने शिक्षक आमदारकीची संधी नगरला मिळू शकली नाही. यामुळे जिल्ह्यात टिडीएफमध्ये मोठी ताटातूट झाल्याने एक गट कचरे यांच्या मागे, दुसरा गट शिंदे यांच्या मागे तर तिसरा टिडिएफचा गट धुळ्याचे संदीप बेडसे यांच्या मागे आहे.टिडिएफमध्ये गट तट पडले. त्यात शिक्षक परिषदेने या गटातटाच्या राजकारणाचा फायदा घेण्यासाठी प्राचार्य सुनील पंडित यांना रिंगणात उतरवले आहे. पंडित यांना मागील वेळीही परिषेदेने उमेदवारी दिली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाल होता. यावेळी पुन्हा परिषदेची उमेदवारी पंडित यांनाच देण्यात आली. यामुळे जिल्ह्यात आता तीन उमेदवार रिंगणात आहेत.पंडित उमेदवारीचे पत्र राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, आ. ना. गो.गणार, मा. आ. भगवानराव साळुंखे, संजीवनीताई रायकर, नरेंद्र वातकर, बाबासाहेब काळे, अनिल बोरनारे, किरण बावठांनकार, विठ्ठल ढगे, अनिल आचार्य यांच्या हस्ते देण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTeacherशिक्षक