शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

शालेय क्रीडा स्पर्धांवर शिक्षकांचा बहिष्कार : जिल्हा क्रीडा कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 15:26 IST

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे (निंबाळकर) यांनी क्रीडा शिक्षक संघटना, क्रीडा संघटनांना विचारात न घेता मनमानी कारभार चालवला आहे, असा आरोप करीत त्यांची तातडीने बदली करावी

अहमदनगर : जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे (निंबाळकर) यांनी क्रीडा शिक्षक संघटना, क्रीडा संघटनांना विचारात न घेता मनमानी कारभार चालवला आहे, असा आरोप करीत त्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडे करण्यात आली़ तसेच शालेय क्रीडा स्पर्धांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही महासंघाने दिला़आदर्श गाव कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनाही निवेदन देऊन यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, आप्पासाहेब शिंदे, प्रा. सुनील जाधव, भाऊसाहेब रोहोकले, महेंद्र हिंगे, संजय भुसारी, शिरीष टेकाडे, रमाकांत दरेकर, बापू होळकर, एस. एस. नरवडे आदी उपस्थित होते.जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांचे क्रीडा शिक्षक, क्रीडा संघटना पदाधिकाऱ्यांशी वागणे व बोलणे अवमानकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांची बदली न झाल्यास ७ दिवसानंतर जिल्हा क्रीडा कार्यालयास कुलूप लावण्याचा तर ९ आॅगस्ट रोजी क्रांती दिनी काळ्या फिती लावून निषेध करण्याचा इशारा देण्यात आला. २९ आॅगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनी जिल्हा क्रीडा अधिकारी, तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून राष्ट्रीय क्रीडा दिन काळा दिन पाळण्यात येणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे़ स्पर्धा आयोजनासाठी प्रत्येक खेळासाठी किमान १० हजार रुपये निधीची तरतूद असताना जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांनी जाणिवपूर्वक ५० टक्के निधी कपात केला आहे.जलतरण तलावाचा ठेका देण्यासंदर्भातही नावंदे यांची भूमिका संशयास्पद असल्याचे निवेदनात म्हटले आहे़नावंदे यांच्याकडून मनमानी वसुलीजिल्हा क्रीडा संकुलात प्रवेश निधी व क्रीडा मंडळाकडून नावंदे यांनी निधी संकलन सुरू केले आहे़ या मनमानी वसुलीमुळे खेळांडूना आर्थिक भूर्दंड बसला असून, अनेक खेळाडू सरावापासून दूरावले आहे़ खेळाडूंसाठी उभारलेले वसतिगृह मागणी करूनही खुले करण्यात आले नाही. असे याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय