शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कॉपी तपासण्याच्या बहाण्याने शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 18:19 IST

परीक्षा सुरू असताना कॉपी तपासण्याच्या बहाण्याने शिक्षकाने बारावीतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. याप्रकणी शिक्षकाविरूद्ध बेलापूर पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर/बेलापूर : परीक्षा सुरू असताना कॉपी तपासण्याच्या बहाण्याने शिक्षकाने बारावीतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. याप्रकरणी शिक्षकाविरूद्ध बेलापूर पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर त्या शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी करत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.  बाबूराव पांडुरंग कर्णे (रा. बोरावकेनगर, श्रीरामपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत पीडित विद्यार्थिनीच्या आईने फिर्याद दिली. पोलीस आरोपीच्या शोधात आहेत. मंगळवारी श्रीरामपूर तालुक्यातील एका गावातील महाविद्यालयात परीक्षा सुरू असताना हा प्रकार घडला. मुलीने आईला प्राध्यापकाच्या या कृत्याची माहिती दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर काही जागरुक नागरिकांनी महाविद्यालयात जाऊन संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना हा प्रकार सांगितला. यावेळी माफीनामा लिहून देत त्या शिक्षकाने हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ही घटना सर्वश्रुत झाल्याने बुधवारी हे प्रकरण वाढले. विद्यार्थी, पालक व नागरिकांनी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली. बुधवारी सकाळी १० वाजता ग्रामस्थ विद्यालयात जमा झाले.  शिक्षकाला निलंबित करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. त्यास ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावे, अशी संतप्त जमावाची मागणी होती. यावेळी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट हे तातडीने दाखल झाले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल होताच तो शिक्षक फरार झाला आहे. पोलीस त्याच्या मागावर असून त्यास लवकरात लवकर ताब्यात घेऊ, असा विश्वास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या विनंतीनंतर ग्रामस्थांनी बंद मागे घेतला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीShrirampurश्रीरामपूर