शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यात तूर खरेदी केंद्र सुरू : आॅनलाईनमुळे विक्रीसाठी लाईन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 16:31 IST

मागील वर्षापासून नगर तालुका बाजार समितीत तूर, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र सुरु झाले आहे. या मार्केटमध्ये जिल्ह्यामधून शेतीमाल येत आहे . चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी जिल्हाभरातून विक्रीसाठी येत आहेत .

केडगाव : मागील वर्षापासून नगर तालुका बाजार समितीत तूर, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र सुरु झाले आहे. या मार्केटमध्ये जिल्ह्यामधून शेतीमाल येत आहे . चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी जिल्हाभरातून विक्रीसाठी येत आहेत . आता आॅनलाईन सुविधेमुळे शेतक-यांना लाईन मध्ये थांबण्याची गरज पडणार नाही . सरकारने आॅनलाईनचा निर्णय चांगला घेतला यामुळे शेतक-यांचा वेळ व पैसा वाचला, असे प्रतिपादन अक्षय कर्डिले यांनी केले.नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथे तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते . यावेळी सभापती विलास शिंदे, रेवणनाथ चोभे ,सचिव अभय भिसे , दिलीप भालसिंग , हरिभाऊ कर्डिले , बाबासाहेब जाधव , संतोष कुलट , संतोष म्हस्के , बन्सी कराळे , श्रीकांत जगदाळे बाबा आव्हाड आदी उपस्थित होते. यावेळी कर्डिले म्हणाले, मागील वर्षी जास्त शेतमालाची आवक आल्यामुळे बारदान्याचा प्रश्न निर्माण झाला होता . मात्र यंदा बारदान्याची अडचण येणार नाही . आतापर्यंत ७७५ गोण्याची नोंद झाली आहे . तूर खरेदी सुरू झाली आहे . ज्या शेतक-यांचा नंबर येईल त्यांना मोबाईलवर मेसेज येणार आहे . तेव्हाच शेतक-यांनी आपला शेतमाल घेऊन यावा .आ. शिवाजी कर्डिले यांनी शेतक-यांसाठी तूर खरेदी केंद्राचा निर्णय घेतला आहे असे अक्षय कर्डिले यांनी सांगितले .चोभे म्हणाले, महाराष्ट्र शासनाकडून शेतक-यांसाठी बाजार समितीच्या वतीने तूर आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यात आले .ज्या शेतक-यांनी मागील महिन्यात नोंद केली आहे . त्यांना मेसेज येणार आहे . त्या शेतक-यांनी आपला माल लगेच घेऊन यावा . मालाला चांगली गुणवत्तेसाठी क्लिंनिंग मशीनची व्यवस्था करणार आहोत . तेव्हा शेतक-यांनी चांगला माल घेऊन यावा . 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMarket Yardमार्केट यार्ड