श्रीगोंदा : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, पिंपळगाव पिसा, बेलवंडी, सावित्रीबाई फुले महाविद्यालय पारगाव, ग्रामीण रुग्णालय, संत शेख महंमद महाराज कोविड सेंटरला भेटी दिल्या. श्रीगोंदा येथे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कोरोनाच्या संदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी काही सूचना मांडल्या. प्रांताधिकारी स्वाती दाभाडे यांनी कोरोना संदर्भात सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी माजी आमदार राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, मनोहर पोटे, तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, नायब तहसीलदार योगीता ढोले, डॉ.संघर्ष राजुळे, प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के, अशोक खेंडके, प्रशांत गोरे, सतीश मखरे, संदीप नागवडे उपस्थित होते.
तनपुरे यांनी घेतला श्रीगोंद्यात आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:20 IST