आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ १३ - पाच तालुक्यांमधील ५४ गावे व अडीचशे वाड्यावस्त्यांना एकूण ७१ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे़ यातील सर्वाधिक २६ टँकर पारनेर तालुक्यात सुरु आहेत़एप्रिल-मे महिन्यात पाणी पातळी खालावल्याने तसेच उन्हाचा कडाका वाढल्याने जिल्ह्यात टँकरचे प्रमाण वाढले आहे़ मागील वर्षीपेक्षा टँकरचे प्रमाण यंदा कमी असले तरी मे महिना उजाडताच टँकर संख्येत वेगाने वाढ होत आहे़ सद्यस्थितीत पारनेर तालुक्यात १९ गावे व १०७ वाड्या वस्त्यांवरील ४५ हजार लोकसंख्येला २६ टँकरच्या ७१ खेपांद्वारे तर पारनेर नगरपंचायत हद्दीत १० टँकरद्वारे १० हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा होत आहे़ संगमनेरमधील २० गावे व ४५ वाड्या वस्त्यांवरील ४० हजार लोकसंख्येला प्रशासनाने १८ टँकर सुरु केले आहेत़ नगर तालुक्यातील ७ गावे ३२ वाड्यावस्त्यांना ८ टँकर, अकोले तालुक्यातील ३ गावे, ५ वाड्यावस्त्यांना ३ टँकर, पाथर्डी तालुक्यातील ४ गावे आणि १३ वाड्यावस्त्यांना ६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे़
टँकरने ओलांडली सत्तरी
By admin | Updated: May 13, 2017 13:44 IST