शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा तालुक्यात तमाशा कलावंतांना मारहाण : महिलांचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 14:36 IST

टाकळी लोणार येथे यात्रेनिमित्ताने आयोजित केलेल्या तमाशात गावातीलच रिपांईच्या २०-२५ कार्यकर्त्यांनी हिरामण बडे- शिवकन्या बडे तमाशा मंडळे यांच्या तमाशातील कलावंताना जबर मारहाण केली.

श्रीगोंदा : टाकळी लोणार येथे यात्रेनिमित्ताने आयोजित केलेल्या तमाशात गावातीलच २०-२५ कार्यकर्त्यांनी हिरामण बडे- शिवकन्या बडे तमाशा मंडळे यांच्या तमाशातील कलावंताना जबर मारहाण केली. यामध्ये काही महिला कलावंताचा विनयभंगही करण्यात आला. मारहाणीमध्ये दहा ते बारा तमाशा कलावंत जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री घडली आहेश्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार ग्रामस्थांनी यात्रेनिमित्ताने शिवकन्या बडे यांचा तमाशा आयोजित केला होता. तमाशा सुरू होण्यापूर्वी पाचते सहा कार्यकर्ते तमाशा कलावंताच्या तंबूत घुसले. त्यांनी विनाकारण तमाशा कलावंताशी हुज्जत घातली. त्यानंतर शिवकन्या बडे त्यांच्या पाया पडल्या. आम्ही तुमच्या गावात आम्ही पोट भरण्यासाठी आलो आहोत. आम्हाला त्रास देऊ नका असेही त्या म्हणाल्या. हल्लेखोरातील एका बडे यांना धमकी दिली. तुम्हाला आमचा झटका दाखवितो असे म्हणून तो निघून गेला. त्यानंतर अर्ध्या तासाने २०-२५ तरुणाचे टोळके तमाशा तंबूत घुसले. तमाशातील महिला व पुरुष कलावंताना बेदम मारहाण केली. काही कलावंत मुलींचा विनयभंगही त्यांनी केला. त्यांचे कपडे फाडले तसेच तंबूचे नुकसान केले. जखमींना नगर येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले .पोलीस आले अन मोकळ््या हाताने परतलेया हल्ल्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस गावात आले. मात्र कसलीही चौकशी न करता आल्या पावली ते निघून गेले. तमाशा कलावंतावर झालेल्या हल्ल्याची कोणतीही दखल पोलीसांनी घेतली नाही. पोलिसांनाही या प्रकरणाकडे गंभीरपणे पाहिले नाही.तक्रार केली तरच गुन्हा दाखल करूतमाशा कलावंतांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करू. त्यानंतर आरोपींना अटक करता येईल, असे श्रीगोंदा पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीसShrigondaश्रीगोंदा