लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्हा परिषदेसह सर्व सभा ऑफलाईन होत असताना महापालिकेचीच सभा ऑनलाईन का होते, असा सवाल उपस्थित करत पुढची सभा ऑफलाईन घ्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केली आहे.
वारे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला होता. दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले. सर्व काही सुरळीत होत आहे. जिल्हा परिषदेची सभा गेल्या काही दिवसांपासून ऑफलाईन होत आहे, परंतु, महापालिकेच्या सभा ऑनलाईन धेण्यात येत आहेत. ऑनलाईन सभेत सहभागी होताना अडचणी येतात. सविस्तर चर्चा सदस्यांना करता येत नाही. अधिकारीही उपस्थित नसतात. त्यामुळे सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत ठोस निर्णय होत नाही. त्यामुळे सभा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन घेण्यात यावी. नियमांचे पालन करून सभा घेणे शक्य असून, पुढील सभा ऑफलाईन घेण्यात यावी, अशी मागणी वारे यांनी केली.