शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मनातील भीती दूर करा, कोरोनासोबत जगायला शिका; सकारात्मक विचारातून नैराश्य संपते, मानसोपचार तज्ज्ञांचे मत

By अरुण वाघमोडे | Updated: June 19, 2020 17:22 IST

कोरोनामुळे काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी  प्रत्येकाला यावर मात करणे सहज शक्य आहे. प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि मनमोकळा संवाद यातून कुठलीही भीती आणि नैराश्यावर विजय मिळविता येतो असे मत ‘लोकमत’च्यावतीने आयोजित आॅनलाईन परिसंवादात मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले.

लोकमत आॅनलाईन परिसंवाद   

अहमदनगर : कोरोना या साथीच्या आजारामुळे गेल्या तीन महिन्यांपासून प्रत्येकाच्या मनात भीती, चिंता, नैराश्य आणि भविष्याची काळजी असे एक भयावह वातावरणाचे काहूर निर्माण झाले आहे. कोरोना या आजारापेक्षा त्याच्या भितीने जास्त लोक प्रभावित झाले असून, मानसोपचार तज्ज्ञांकडील गर्दी वाढली आहे. प्रत्यक्षात मात्र भीती घेऊन आणि कुढत जगावे अशी परिस्थिती मुळीच नाही. कोरोनामुळे काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी  प्रत्येकाला यावर मात करणे सहज शक्य आहे. प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि मनमोकळा संवाद यातून कुठलीही भीती आणि नैराश्यावर विजय मिळविता येतो असे मत ‘लोकमत’च्यावतीने आयोजित आॅनलाईन परिसंवादात मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले.

या परिसंवादात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमित सपकाळ, डॉ़. अश्विन झालाणी व मानसशास्त्रज्ञ प्रा. योगिता खेडकर हे सहभागी झाले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाले. अनेकांच्या नोक-या गेल्या. शारीरिक आरोग्य राखण्यासह जगण्यासाठीही संघर्ष सुरू आहे. समाजातील अनेकांनी बदलेले हे वातावरण आत्मसात करत आपली ‘रुटीन लाईफ’ सुरू केली आहे. बहुतांशी जणांना मात्र ही नवीन जीवनशैली आत्मसात करण्यात अडचणी निर्माण होत आहे. अशा लोकांचा मानसिक संघर्ष सुरू आहे. त्यांना वर्तमानासह भविष्याची चिंता सतावत आहे. यातून डिप्रेशन निर्माण होऊन काही जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. मानवी जीवन मात्र अनमोल आहे. आजपर्यंत माणसाने प्रत्येक संकटावर मात करत आपले अस्तित्व सिध्द केले. हे़ आताही मनातील भीती दूर करून प्रत्येकाने कोरोनासोबत मोठ्या हिमतीने जगायला शिकावे, असा सल्ला परिसंवादातून मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अगदी छोट्या-छोट्या गोष्टींना लोक घाबरत आहेत. यातून कोरोनाचे नव्हे तर भितीचे पेशंट वाढत आहे. प्रत्यक्षात कोरोनाचा मृत्यूदर अतिशय कमी आहे़. त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. सोशल मीडियातून पसरणाºया अफवांवर विश्वास ठेवू नये, स्वत:ला कामात गुंतवून घ्यावे. कितीही अडचण असली तरी येणा-या काळात ही परिस्थिती नक्कीच बदलणार आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोण ठेवून जगायला शिकावे.     -डॉ़. अमित सपकाळ, मानसोपचार तज्ज्ञ.

सकारात्मक विचार, मनमोकळा संवाद, नियमित व्यायाम, घराबाहेर पडल्यानंतर नियमांचे पालन आणि चांगला आहार ही पंचसूत्री आत्मसात केली तर कुणालाच अडचण निर्माण होणार नाही. नको त्या बाबींचा विचार करणे, विनाकारण चिंता आणि भविष्याची सतत काळजी यातून चिडचिड निर्माण होऊन आपले आरोग्य आणि कुटुंबावरही त्याचा विपरित परिणाम होतो़. यासाठी बदल्या परिस्थितीनुसार स्वत: बदल करा, मित्र, कुटुंबीयांना समजून घ्या़ यातून प्रत्येक समस्या आणि प्रश्नाचे उत्तर मिळेल.     - डॉ़.अश्विन झालाणी, मानसोपचार तज्ज्ञ.

कोरोना हा साथीचा आजार अथवा यामुळे निर्माण झालेली परिस्थितीही लवकर संपणारी नाही. नव्याने ओढावलेल्या या आपत्तीमुळे सर्वांच्या जीवनावर कमी अधिक परिणाम झालेला आहे. त्यामुळे या गोष्टींवर जास्त विचार न करता प्रत्येक अडचणीतून नव्याने वाट शोधण्याची गरज आहे. आता काहीच शक्य नाही अथवा आत्महत्येचा विचार हा कधीच उपाय ठरू शकत नाही. आजही प्रत्येकासाठी अनेक संधी आहेत. दृष्टिकोन बदलून या संधीचा शोध घ्यावा. जगण्याचा नवा नक्कीच मार्ग सापडेल़.    - प्रा. योगिता खेडकर, मानसशास्त्रज्ञ. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरHealth Tipsहेल्थ टिप्स