शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विखेंच्या प्रवेशाने श्रीगोंद्यातील समीकरणे बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 18:48 IST

डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्याने खासदार दिलीप गांधी यांचे समर्थक नाराज झाले पण श्रीगोंद्यातील राजकिय समीकरणे बदलणार आहेत.

बाळासाहेब काकडे श्रीगोंदा : डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्याने खासदार दिलीप गांधी यांचे समर्थक नाराज झाले पण श्रीगोंद्यातील राजकिय समीकरणे बदलणार आहेत. याचे पडसाद तालुक्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर उमटणार आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते विरोधकांची मुठ बांधली होती. पवार विरोधक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही राहुल जगताप यांच्या मागे आपली फौज उभी केली होती. कुकडी कारखाना, नागवडे कारखाना, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, ग्रामपंचायत, सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पाचपुते विरोधकांनी हातात घालून काम केले. नगरपालिका निवडणुकीपासून आघाडीची मूठ काही प्रमाणात सैल झाली. नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी पोटे यांची वर्णी लागली पण बहुमत मात्र भाजपाने मिळविले. शरद पवारांनी विखे यांना चेकमेट देण्यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी अनुराधा नागवडे यांचे नाव पुढे केले. पवारांची रणनिती पाहून डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे खासदार दिलीप गांधी यांचे श्रीगोंद्यातील समर्थक नाराज होणे सहाजिकच आहे विखेंना मानणारे दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब गिरमकर, अ‍ॅड सुभाष डांगे, सिध्देश्वर देशमुख, बाळासाहेब नाहाटा यांनी भाजपात प्रवेश केला. पण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आण्णासाहेब शेलार हे जागीच थांबले आहेत. भविष्यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या बरोबर अण्णासाहेब शेलार हे भाजपात जाण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीपासून बबनराव पाचपुते हे एकाकी पडले होते. विखेंच्या आगमनाने पाचपुतेंना नवी ऊर्जा मिळाली आहे. विखे सेना पाचपुतेंची जमेची बाजू ठरणार आहे. विखेंची ताकद मोठी असली श्रीगोंद्यात मताधिक्य मिळविण्यासाठी विखे सेनेची दमछाक अटळ आहे. आमदार राहुल जगताप आणि राजेंद्र नागवडे हे एकत्र आहेत. ते आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करतील. लोकसभा निवडणुकीसाठी अनुराधा नागवडे यांना पवारांनी शब्द दिला होता. त्यावर नागवडे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचे निश्चित केले पण जर चेकमेटच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीसाठी पवारांनी नागवडेंना डावलले. आगामी काळात नागवडेंची नाराजी दूर करणे पवार कुंटुबियांना अवघड जाणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आमदार राहुल जगताप हे आपल्या भविष्याच्या दृदृष्टीने कसे डावपेच खेळतात, हे महत्वाचे ठरणार आहे.
टॅग्स :Ahmednagarअहमदनगर