शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णकन्या श्रध्दा घुले विवाहबंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 12:32 IST

अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये उंच उडी व तिहेरी लांब उडीत ६१ सुवर्णपदकांसह १३२ पदके पटकाविणारी अकोले येथील सुवर्णकन्या श्रध्दा घुले शनिवारी सायंकाळी गोरज मुहूर्तावर विवाहबध्द झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोले : अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये उंच उडी व तिहेरी लांब उडीत ६१ सुवर्णपदकांसह १३२ पदके पटकाविणारी अकोले येथील सुवर्णकन्या श्रध्दा घुले शनिवारी सायंकाळी गोरज मुहूर्तावर विवाहबध्द झाली. संगमनेर येथे झालेल्या विवाहाला राज्यभरातील क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसह मान्यवरांनी हजेरी लावून तिला शुभेच्छा दिल्या.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथील आय.ए.एस. अधिकारी रवींद्र खताळे यांच्याशी संगमनेर येथील मालपाणी हेल्थ कल्बमध्ये हा विवाह मोठ्या थाटात पार पडला. या विवाह सोहळ््याला विद्यावाचस्पती महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवीतकर, माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, आ. वैभव पिचड, आ. राजाभाऊ वाजे (सिन्नर), धावपटू ललिता बाबर, जुन्नरच्या विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, माजी आमदार माणिकराव कोकाटे (सिन्नर), अ‍ॅड. भगिरथ शिंदे, नाशिकचे जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धा यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचे आजोबा पांडुरंग घुले यांनी मान्यवरांचे स्वागत केले.युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णकन्या ठरलेल्या श्रध्दाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय व विद्यापीठ पातळीवर तिहेरी व उंच उडीत ६३ सुवर्ण,२४ रौप्य ,२७ क ांस्य अशी एकूण ११४ पदके पटकाविली आहेत. महाराष्ट्रातील १८ वर्षे, २० वर्षे व महिला अ‍ॅथलेटिक म्हणून उंच व तिहेरी उडी क्रीडा प्रकारात अनेक विक्रमांची नोंद तिच्या नावावर आहे. २००७ साली पुणे येथे युवा राष्ट्रकुल स्पर्धेत तिहेरी उडीत तिने अगोदरचे विक्रम मोडीत काढत १३.११ मीटर उडी घेत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. २०१४ ला यशवंतराव चव्हाण ‘क्रीडा युवती’ पुरस्काराने, तर महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती पुरस्काराने तिचा नुकताच गौरव केला आहे. पतियाळा येथे ‘बेस्ट अ‍ॅथलेटिक वुमन’ अवॉर्ड तिला प्राप्त झाला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर