शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान घरकूल योजनेला सर्वेक्षणाची चौकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 18:03 IST

अहमदनगर : शहरी भागात राबविली जाणारी घरकूल योजना सर्वेक्षणाच्या चौकटीत अडकली आहे़ शहरी भागाचे सर्वेक्षण करणा-या सल्लागार संस्थांकडून लाभार्थींची ...

अहमदनगर : शहरी भागात राबविली जाणारी घरकूल योजना सर्वेक्षणाच्या चौकटीत अडकली आहे़ शहरी भागाचे सर्वेक्षण करणा-या सल्लागार संस्थांकडून लाभार्थींची निवड अद्याप करण्यात आलेली नाही़ त्यामुळे घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरी भागातील जनतेला यंदाच्याही दिवाळीत हक्काचे घर मिळू शकलेले नाही.शासनाने डिसेंबर २०१६ मध्ये सर्वांसाठी घरकूल योजनेची घोषणा केली़ येत्या २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा सरकारचा संकल्प आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील शहरी (तालुका मुख्यालये) भागांतील ३३ हजार ४९७ नागरिकांना हक्काचा निवारा मिळणार आहे. लाभार्थींची निवड करण्यापूर्वी शहरी भागातील स्वत: ची घरे असलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करावे, असे संकेत आहेत. त्यानंतर लाभार्थींची निवड केली जाणार असून, महापालिकांसह नगरपालिकांकडून सल्लागार संस्थांची निवड करण्यात आलेली आहे. नवीन शेवगाव, जामखेड, कर्जत, अकोले आणि पारनेर पालिकांनी मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. उर्वरित नऊ नगरपालिकांना घरकुलांचे उद्दिष्ट आहे़ योजनेचा पहिला टप्पा सर्वेक्षणाचा आहे. मात्र महापालिकेसह जुन्या नऊ नगरपालिका सर्वेक्षणाचा पहिला टप्पाही पार करू शकलेल्या नाहीत. शिर्डी नगरपालिकेने अद्याप सर्वेक्षण करण्यासाठी सल्लागार संस्थेचीही नियुक्तीच केली नाही. ज्या नगरपालिकांनी सल्लागार संस्थांची नियुक्ती केली नाही, अशा नगरपालिकांकडून लाभार्थींची निवड झालेली नाही.शहरी भागात किती नागरिकांकडे स्वत: ची घरे नाही, याची माहिती वर्षे उलटूनही प्रशासनाच्या हाती आलेली नाही. ती आल्यानंतरच घरकुलासाठी लाभार्थींची निवड करण्याची प्रक्रिया सुरू होईल. सर्वेक्षण करण्यासाठी सल्लागार संस्थेच्या नियुक्तीसाठी निविदा मागविणे, प्राप्त निविदांना समितीची मंजुरी घेणे आणि संस्थांना कार्यारंभ आदेश देण्यास विलंब झाला़ परिणामी पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब झाला असून, येत्या २०२२ पर्यंत किमान शहरी भागातील नागरिकांना तरी हक्काची घरे मिळतील का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

घरकुलांचे उद्दिष्ट

नगर शहर- १६ हजार २३८, श्रीरामपूर-३ हजार ९८९, संगमनेर-३ हजार २, कोपरगाव-३ हजार ८२, राहुरी-१ हजार ८०२, राहाता-१ हजार १०२, पाथर्डी-१ हजार २५१, श्रीगोंदा-१ हजार ४५२, शिर्डी-१ हजार ५७९

उद्दिष्ट नसलेल्या पालिका

जुन्या नगरपालिकांपैकी देवळाली प्रवरा नगरपालिकेला घरकुलांचे उद्दिष्ट नाही. उर्वरित नवीन शेवगाव, जामखेड, कर्जत, अकोले, पारनेर आणि नेवास नगरपंचायतींना उद्दिष्ट देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरprime ministerपंतप्रधानHomeसुंदर गृहनियोजनGovernmentसरकार