शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

राहुरीत पोलीस अन् दरोडखोरांमध्ये थरार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:58 IST

अट्टल दरोडेखोरांनी सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येथील गोकुळ क ॉलनी परिसरात पोलिसांवर पाच मिनिटे दगडफे क केली. भिंतीचा आधार घेत पोलीस निरीक्षक मुकुंद गायकवाड यांच्या पथकाने तीन जणांना पकडले. अन्य दोघे पळून जाण्यास यशस्वी ठरले.

 राहुरी : अट्टल दरोडेखोरांनी सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येथील गोकुळ क ॉलनी परिसरात पोलिसांवर पाच मिनिटे दगडफे क केली. भिंतीचा आधार घेत पोलीस निरीक्षक मुकुंद गायकवाड यांच्या पथकाने तीन जणांना पकडले. अन्य दोघे पळून जाण्यास यशस्वी ठरले. पोलिसांनी गोळीबार करण्याचा निर्णय घेण्यापूर्वीच दरोडेखोर हाती लागल्याने पुढील धोका टळला.राहुरी येथील गोकुळ कॉलनीमध्ये दरोडा घालण्यासाठी सहा जण काटेरी झुडुपांच्या मागे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी पोलीस आल्याचे पाहताच दरोडेखोरांनी पथकावर दगडाचा मारा सुरू केला. दगडाचा मारा सुरू झाल्यानंतर पोलिसांनी भिंतीचा आधार घेतला़. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार करण्याचा निर्णय घेण्यापूर्वीच एकास पकडले. त्यानंतर पाठलाग करुन अन्य तिघांनाही जेरबंद केले. पकडलेल्या दरोडेखोरांकडून पोलिसांनी गॅसकटर, गॅस टाकी, कटावणी, कात्री व दोन मोटारसायकलसहअन्य साहित्य  जप्त केले आहे. दरोडेखोर हे सराईत गुन्हेगार आहेत. ते संगमनेर, श्रीरामपूर आदी भागातील असल्याचे  समोर आले आहे. सागर गोरख मांजरे (रा.पाईपलाईन रोड, अहमनगर),अविनाश अजित नागपुरे (रा. भिंगार, ता़नगर), गणेश मारूती गायकवाड (रा. उक्कलगाव, ता़श्रीरामपूर) असे पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राक्षे, पाखरे, मेढे, शिंदे, अमित राठोड, दिवे, बोडखे व दोन होमगार्ड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बागुल हे करीत आहेत.फरार आरोपींच्या शोधासाठी पथकेराहुरी पोलिसांनी पकडलेल्या तीन दरोडेखोरांची चौकशी सुरू केली आहे. फरार झालेल्या दोन जणांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. हे सर्व दरोडेखोर सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस चौकशीत उघडकीस आले आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यापासून राहुरी तालुका व परिसरात भुरट्या चो-या, रस्ता लूट, दरोड्यांच्या घटनात वाढ झाली आहे. या टोळीकडून त्यांनी आणखी विविध ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची चिन्हे आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी