शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
3
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
4
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
5
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
6
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
7
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
8
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
9
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
10
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
11
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
12
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
14
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
15
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
16
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
17
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
18
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
19
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
20
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

अपघातग्रस्तांना मदत : शासन देणार बक्षीस, जिल्ह्यातून पहिला प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 11:17 IST

अपघातग्रस्तांना मदत केली तर नाहक पोलिसांची कटकट मागे लागेल या मानसिकतेतून बहुतांशी जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्यांकडे कानाडोळा करून पुढे जातात.  एमआयडीसी पोलिसांनी मात्र अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांना शासनाकडून बक्षीस मिळावे अशी शिफारस करत एक सकारात्मक संदेश दिला आहे.

अहमदनगर : अपघातग्रस्तांना मदत केली तर नाहक पोलिसांची कटकट मागे लागेल या मानसिकतेतून बहुतांशी जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्यांकडे कानाडोळा करून पुढे जातात.  एमआयडीसी पोलिसांनी मात्र अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांना शासनाकडून बक्षीस मिळावे अशी शिफारस करत एक सकारात्मक संदेश दिला आहे.नगर तालुक्यातील शिंगवेनाईक येथे २५ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता शिर्डी येथून नगरच्या दिशेने येणाºया प्रवासी बसचा अपघात झाला. ही बस रस्त्यावरच आडवी पडल्याने यामध्ये ३४ प्रवासी अडकून पडले़ यातील बहुतांशी जण गंभीर जखमी झालेले होते. ही घटना समजताच शिंगवे नाईक येथील सरपंच सुनील को-हाळे, उपसरपंच सुनील जाधव यांच्यासह विजय जाधव, रावसाहेब जाधव व अनिल डोळस हे तत्काळ घटनास्थळी आले. या ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. तसेच याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह सहाय्यक निरीक्षक गोरे, सहाय्यक फौजदार गोसावी, कॉन्स्टेबल ढाकणे, काळे, गावडे, पांढरकर, मणिकेरी व कोळपे शिंगवेनाईक येथे दाखल झाले़ यावेळी ग्रामस्थ व पोलीस पथकाने बसमध्ये अडकलेल्या ३४ प्रवाशांना बाहेर काढले़ जखमींना नगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जे प्रवासी जखमी झाले नव्हते त्यांची शिंगवे नाईक येथे तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली. क्रेनद्वारे रस्त्यात पडलेली बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघातसमयी तत्काळ मदत कार्य करून जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका निभावणा-या या पाच ग्रामस्थांना शासनाच्या अध्यादेशानुसार मदत मिळावी, असा प्रस्ताव सहाय्यक निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तीन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला आहे. अधीक्षकांमार्फत हा प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. अशी आहे बक्षीस योजनाअपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळून त्यांचे प्राण वाचावेत यासाठी शासनाने २०१४ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार अपघातग्रस्तांना मदत करणा-या व्यक्ती, संस्था, समूह यांना ५० हजार ते दीड लाख रूपयांपर्यंत बक्षीस देण्यात येते. अपघात घडल्यानंतर एक महिन्याच्या आत बक्षिसाची मागणी करणारा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, वाहतूक शाखेचे निरीक्षक यांच्यामार्फत पाठविणे बंधनकारक आहे. प्रस्ताव गेल्यानंतर मार्च अखेरपर्यंत शासनाकडून संबंधितांना हे बक्षीस दिले जाते. अपघात झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने बहुतांशी जणांचा रस्त्यावरच प्राण जातो. अपघाताची घटना निदर्शनास आल्यानंतर तेथून जाणा-या प्रवाशांनी अथवा परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, जखमींना मदत करावी, त्यांना रूग्णालयात दाखल करावे अशी अपेक्षा असते. बहुतांशी जण अशावेळी मदतही करतात तर काही नागरिक मदत करत नाहीत. अशा घटनांबाबत समाजात एक सकारात्मक संदेश जावा, अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी अपघातग्रस्तांना मदत करणा-या शिंगवेनाईक येथील ग्रामस्थांना शासनाकडून बक्षीस मिळावे, यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.- विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक, एमआयडीसी ठाणे 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस