शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
2
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
3
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
4
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
5
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
6
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
7
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
8
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
9
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
11
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
12
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
13
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
15
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
16
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
17
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
18
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
19
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
20
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम

शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपाला संघटनांचाही पाठिंबा

By | Updated: December 8, 2020 04:18 IST

टाळेबंदी काळात शेतकरी विरोधात केलेल्या कायद्यामुळे देशातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. हे काळे कायदे रद्द होण्यासाठी सर्व शेतकरी ...

टाळेबंदी काळात शेतकरी विरोधात केलेल्या कायद्यामुळे देशातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. हे काळे कायदे रद्द होण्यासाठी सर्व शेतकरी एकवटले असून, त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत मंगळवारचा देशव्यापी संप यशस्वी करण्यात येणार आहे. या संपासाठी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, आयटकचे अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, बहिरनाथ वाकळे, किसान सभेचे अ‍ॅड. बन्सी सातपुते, कॉ. एल. एम. डांगे, कॉ. बाबा आरगडे, सिटूचे कॉ. महेबूब सय्यद, संताराम लोणकर, सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, राजेंद्र लांडे, प्रशांत म्हस्के, श्रमिक शेतकरी संघटनेचे राजेंद्र बावके, जीवन सुरडे, मनपा कर्मचारी युनियनचे अनंत लोखंडे, साखर कामगार युनियनचे आनंद वायकर, विडी कामगार युनियनच्या भारती न्यालपेल्ली, शिक्षकेत्तर संघटनेचे भाऊसाहेब थोटे, अंगणवाडी सेविका संघटनेच्या शोभा तरोटे आदि प्रयत्नशील आहेत.

-------------

संपासाठी नगर जिल्ह्यासह राज्य आणि देशभर विविध संघटनांनी, राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. पालेभाज्या, फळे, दूध तसेच इतर पुरवठा बंद करण्यासह बाजार समित्याही बंद ठेवण्याबाबत आवाहन केले आहे. याशिवाय शहरातील इतर बाजारपेठा आणि वाहतूकही बंद ठेवण्याबाबत आवाहन केले असून सर्वांनी या बंदला पाठिंबा द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी संघटनांसह इतर पदाधिकारी तहसीलदार किंवा आपापल्या स्थानिक प्रशासनाला केंद्र शासनाच्या निषेधाचे निवेदन देतील.

- डॉ. अजित नवले, सरचिटणीस, भारतीय किसान सभा

--------------------

भारत बंदमध्ये शेतकरी संघटना सहभागी होणार नाही. नवीन कायदे रद्द झाल्यास शेतकरी व्यापारस्वातंत्र्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद होईल. दिल्लीतील आंदोलन पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या फायद्याचे असले तरी देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. सरकारने या आंदोलनाच्या दबावामुळे नवीन कृषी सुधारणा कायदे मागे घेतले तर पुढील पन्नास वर्षे तरी कोणताही राजकीय पक्ष शेती व्यापाराला स्वातंत्र्य देण्याचे धाडस करणार नाही. आंदोलक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाजार समित्या व एमएसपी सुरू राहणार आहे, मग आता आंदोलन सुरु ठेवण्याचे कारण नाही. कायदेच रद्द करा ही मागणी अत्यंत चुकीची आहे.

- अनिल घनवट, अध्यक्ष, शेतकरी संघटना