अहमदनगर : खास महिलांसाठी दरवर्षी आयोजित केले जाणारे नेत्र भेट शिबिर हे आजपर्यंत हजारो युवती, महिलांना अलौकिक भेट ठरले आहे. साई सूर्य नेत्र सेवामध्ये डॉ. सुधा व डॉ. प्रकाश कांकरिया यांचा सुरू असलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.
येथील साई सूर्य नेत्रसेवा दालनात महिला दिनानिमित्त खास उपवर मुली व महिलांसाठी विवाहदृष्टी भेट नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी घुले बोलत होत्या. दृष्टिदोष असल्यामुळे चष्मा लागतो व उपवर मुलींसाठी लग्नातील तो अडथळा ठरतो. तो अडथळा दूर होऊन त्यांचे जीवन सुकर व आनंदी व्हावे यासाठी साई सूर्य नेत्रसेवा गेल्या ३० वर्षांपासून झटत आहे. या माध्यमातून तरुणींना दिलासा मिळत आहे याचे समाधान वाटते, असे डॉ. सुधा कांकरिया यांनी सांगितले. डॉ. प्रकाश कांकरिया यांनी नेत्रपेढी व नेत्रसेवाबाबतच्या विविध टप्प्यांची व ऑपरेशनची माहिती दिली. हे शिबिर आणखी आठ दिवस चालेल, असे ते म्हणाले. (वा.प्र.)
-------
फोटो - ०८डाॅ. कांकरिया