शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षकांनी केली वाळूतस्करांची नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 11:40 IST

जिल्ह्यातील गुन्हेगारीचे मूळ ठरणाऱ्या वाळूतस्करांना जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी चांगलाच चाप लावला आहे़

अहमदनगर : जिल्ह्यातील गुन्हेगारीचे मूळ ठरणाऱ्या वाळूतस्करांना जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी चांगलाच चाप लावला आहे़ नदीपात्रासह रस्त्यांवर दिवसरात्र पेट्रोलिंग वाढवून वाळूतस्करांची नाकाबंदी केली आहे़ अवैध वाळूउपसा करताना कुणी आढळले तर कडक कारवाई केली जात असल्याने सध्या जिल्ह्यातील वाळूतस्कर अंडरग्राउंड झाले आहेत़सिंधू यांनी नगरचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम त्यांनी जिल्ह्यातील अवैध वाळूउपशाबाबत माहिती संकलित केली़ आॅक्टोबर २०१८ पासून जिल्ह्यातील एकाही वाळूठेक्याचा अधिकृत लिलाव झालेला नसताना खुलेआम वाळूतस्करी होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली़ याबाबत सिंधू यांनी जिल्ह्यातील वाळूतस्करी बंद करण्याचे पोलिसांना आदेश दिले़ ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळूतस्करी आढळून येईल तेथील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी दिली़ अधीक्षकांच्या या आदेशामुळे सध्या जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी वाळूतस्करांचा चक्का जाम केला आहे़अवैध वाळूउपसा व वाहतूक करताना कुणी आढळून आले तर थेट कारवाई केली जात आहे़ वाळूतस्करीविरोधात पोलिसांनीसुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे वाळूतस्कर चांगलेच धास्तावले आहेत़वाळूतस्करीविरोधात ‘लोकमत’ची मोहीमजिल्ह्यातील वाळूतस्करीविरोधात ‘लोकमत’ने गेल्या दोन वर्षांपासून वृत्तमालिका प्रकाशित करून या विषयाला वाचा फोडली आहे़ वाळूतस्करीमुळे उजाड झालेले नदीपात्र, पर्यावरणाचा ºहास, खालावलेली पाणीपातळी, वाळूतस्करांकडून वारंवार ग्रामस्थ व महसूल पथकांवर होणारे हल्ले, वाळूवाहतूक करणाºया वाहनांमुळे झालेले अपघात ते वाळूतस्करांमुळे जिल्ह्यात एकूणच वाढलेली गुन्हेगारी यावर प्रकाश टाकला आहे़कोरड्या नदीपात्रांवर आता पोलिसांचा वॉचउन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वच नदीपात्र कोरडे होतात़ कोरडे पडलेल्या नदीपात्रात वाळूउपसा करण्यासाठी तस्करांची झुंबड उडायची़ स्थानिक पोलीस आणि महसूल विभागातील अधिकारीही याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करायचे़ त्यामुळे नदीपात्रात खडक लागेपर्यंत हे तस्कर वाळूउपसा करून पर्यावरणाचा मोठा ºहास करत होते़ गेल्या महिनाभरापासून पोलिसांनी नदीपात्र परिसरात पेट्रोलिंग वाढविल्याने वाळूउपसा थांबला आहे़पोलीस अधिकाऱ्यांनी लिहून दिले प्रतिज्ञापत्रवाळूतस्करीत भागिदारी अथवा वाळूतस्करांशी कुणा पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचे हितसंबंध आढळून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे़ काही पोलीस अधिकाºयांनी तर पोलीस अधीक्षकांना प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे़ ‘आमचा व आमच्या नातेवाईकांचा वाळू वाहतुकीशी काहीही संबंध नाही तसेच माझ्या वा माझ्या नातेवाईकांच्या नावावर असलेले वाहन वाळू वाहतुकीसाठी वापरले जात नाही’ अशा आशयाचा मजकूर या प्रतिज्ञापत्रात आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस