शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुनीता गडाखांचा राजीनामा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 10:36 IST

अहमदनगर : नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख यांच्या सभापतींसह सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर झाला आहे. रिक्त पदाचा अहवाल जिल्हा ...

अहमदनगर : नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख यांच्या सभापतींसह सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर झाला आहे. रिक्त पदाचा अहवाल जिल्हा परिषदेने राज्य निवडणूक आयोगाला शुक्रवारी पाठविला आहे. त्यामुळे नेवासा पंचायत समिती सभापतीसह सोनई गणाच्या सदस्य पदासाठी पोट निवडणूक होणार आहे.मराठा, मुस्लीम आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गडाख यांनी सभापतींसह सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांच्याकडे मंगळवारी दिला होता. अध्यक्ष कार्यालयाकडून राजीनामा मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला़ त्यावर स्वाक्षरी करून मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी गुरुवारी सायंकाळी पोहोच दिली. याचाच अर्थ ही दोन्ही पदे रिक्त झाली आहेत. महाराष्ट्र राज्य पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ७१ नुसार प्रशासनाने नेवासा पंचायत समितीचे सभापती, तर कलम ६० नुसार सोनई गणाचे सदस्य पद रिक्त झाल्याचा अहवाल जिल्हाधिका-यांसह निवडणूक आयोगाला कळविला आहे. नेवासा पंचायत समिती माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या शेतकरी क्रांतीकारी पक्षाच्या ताब्यात आहे. पंचायत समितीत १४ पैकी १२ सदस्य शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकरी क्रांतीकारी पक्षालाच सभापती पदाची संधी मिळेल. त्यामुळे नेवासा पंचायत समितीचे पुढचे सभापती कोण, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख यांनी दिलेल्या राजीन्याची पोहोच मुख्यकार्यकारी अधिका-यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे गडाख यांचे सभापती व सदस्य, ही दोन्ही पदे रिक्त झाली आहेत. तसा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला आहे. -वासुदेव सोळुंके, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, समान्य प्रशासन, जिल्हा परिषद

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद