शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

संडे Motivation - ..अन् मांजरी गाव बनले पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 11:24 IST

तालुक्यातील पूर्व भागाला मुळा नदी जीवनदायीनी ठरली आहे़ मांजरी येथे ग्रामस्थांनी एकजुटीतून वाळू उपसा रोखला आहे. स्थानिक ग्रामस्थांना बांधकामासाठी वाळूची गरज निर्माण झाल्यानंतर बैलगाडीतून वाळू वाहून नेली जाते़

भाऊसाहेब येवले राहुरी : तालुक्यातील पूर्व भागाला मुळा नदी जीवनदायीनी ठरली आहे़ मांजरी येथे ग्रामस्थांनी एकजुटीतून वाळू उपसा रोखला आहे. स्थानिक ग्रामस्थांना बांधकामासाठी वाळूची गरज निर्माण झाल्यानंतर बैलगाडीतून वाळू वाहून नेली जाते़ त्यामुळे हे गाव पाणीदार बनले आहे.मुळा नदीच्या पूर्व भागात अथांग वाळू साठा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्क ा बसतो़ मांजरीसह परिसरातील गावकरीही अभिमानाने वाळू उपसू दिली जात नसल्याचे छातीवर हात ठेऊन सांगतात़ येथील शेतकऱ्यांनी थेट औरंगाबाद खंडपीठात जाऊन वाळूला विरोध केला़ दरवर्षी शासकीय परिपत्रक ग्रामपंचायतीकडे येते़ गावकरी एकमताने वाळू उचलायची नाही, असे म्हणणे मांडतात़ सर्वानुमते ठराव पारीत होतो़ त्यामुळे पूर्व भागात वाळूचा लिलाव होत नाही. त्यामुळे एक पिढीपासून वाळू नदीपात्रात मोत्यासारखी दिसत आहे़ वाळू जपली तर आपण जिवंत राहू याची खात्री गावक -यांना पटली आहे़त्यामुळे गावातील वाळू गावातच राहिली पाहिजे अशी ग्रामस्थांची धारणा झाली आहे़ गावाच्या परिसरात बांधकामासाठी वाळू लागल्यास नियम ठरवून देण्यात आला आहे़ चारचाकी वाहनातून वाळू वाहतूक नाही़ केवळ बैलगाडीने वाळू वाहण्याची परवानगी आहे़ त्यामुळे मर्यादीत स्वरूपात वाळूचा उपसा सुरू आहे. मुळा नदी पात्रातील वाळू न उचलल्यामुळे भूजल पातळी वाढली आहे़ परिसरात वाळू उचलण्याचे गुंडांनी केलेले प्रयत्न हाणून पडले आहे़ लष्करालादेखील येथील ग्रामस्थांनी वाळू उचलू दिली नव्हती, त्यामुळे वाळू उचलेगिरी करणा-यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे़ गावक-यांचा वाळू उपसा करण्यास इतका विरोध आहे की कुणी चारचाकी घेऊन नदीपात्रात आले की सर्व गावकरी जमा होतात़गावक-यांची एकी पाहून कुणीही वाळू उचलीत नाही़ आपले वाहन जाळण्याची भीती असल्याने अलिकडील काळात कुणीही वाळू उचलण्याचा साहस करीत नसल्याचे चित्र आहे़वाळू उचलण्याच्या लिलावाला गावकरी ग्रामसभेत विरोध करतात़ वाळू संदर्भात ग्रामस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे़ गाव वाचवयाचे असेल तर वाळ उचलू द्यायची नाही हे ग्रामस्थांचे धोरण आहे़ दररोज दहा ते बारा बैलगाड्या वाळू उचलली जाते़ त्याचा काहीही परिणाम होत नाही़ -विठ्ठल विटनोर, सरपंच, मांजरीवाळू सुरक्षित असल्यानेच विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी टिकून आहे़ पिकांना दिलासा मिळाला आहे़ जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़ वाळू घरगुती कामापुरती वापरली जाते़ त्यामुळे गावाचा फायदा होत आहे. - कृशाराम जाधव, शेतकरी

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी