शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

संडे अँकर : ऊसतोडणी मजुराचा मुलगा दक्षिण कोरियात, नगरच्या युवानने दाखवली दिशा

By नवनाथ कराडे | Updated: February 24, 2019 16:37 IST

वडील ऊस तोडणी मजूर. दुर्धर आजारामुळे अकाली निधन झाले. आईही अंथरूणाला खिळली. अशा परिस्थितीत दिनेशने हार मानली नाही.

नवनाथ खराडेअहमदनगर : वडील ऊस तोडणी मजूर. दुर्धर आजारामुळे अकाली निधन झाले. आईही अंथरूणाला खिळली. अशा परिस्थितीत दिनेशने हार मानली नाही. परिस्थितीशी लढा देत डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. त्याला नुकतीच दक्षिण कोरियाच्या ‘ह्योसंग’ या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची संधी मिळाली. व्हिएतनाममधील सहा महिन्याच्या विशेष प्रशिक्षणासाठी तो रवाना झाला. नगरमधील संदीप कुसळकर यांच्या ‘युवान’ संस्थेने त्याला जिवनाची दिशा दाखवली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दिनेश जाधवची संघर्षगाथा...दुर्धर आजारामुळे वडिलांचे निधन झाले. आईही अंथरुणाला खिळली. दिनेशने आश्रमशाळेत राहून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याचा खरा संघर्ष दहावीनंतर सुरू झाला. सरकारी नियमानुसार दहावीनंतर दिनेशला आश्रमशाळेतून बाहेर पडावे लागले. पुढील निवास, शिक्षण, भोजन, करिअर मार्गदर्शन असे अनेक प्रश्न दिनेश समोर होते.अशा परिस्थितीत त्याला अहमदनगर शहरातील संदीप कुसळकर यांच्या ‘युवान’ संस्थेची माहिती मिळाली. चांगला अभ्यास करण्याच्या अटीवर त्याला ‘युवान’ मध्ये प्रवेश मिळाला. मिळालेल्या संधीचे दिनेशने सोने केले. पुढील सत्रात विशेष प्राविण्यासह सर्व विषयात तो उत्तीर्ण झाला. पुढील २ वर्षे टॉप राहिला. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून विशेष प्राविण्यासह डिप्लोमा दिनेशने पूर्ण केला. पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी ‘युवान’ घेत होते. मात्र आईच्या उपचारासाठी त्याने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत नगरमधील एमआयडीसीत काही महिने कामकेले. चांगल्या नोकरीसाठी संधीची वाट तो पाहात होता. ही संधी त्याला नुकतीच चालून आली. औरंगाबाद येथे दक्षिण कोरियाच्या नामांकित ‘ह्योसंग’ या बहुराष्ट्रीय कंपनीत त्याची नुकतीच निवड झाली. कंपनी मार्फत विशेष प्रशिक्षणासाठी तो व्हिएतनामला पोहोचला आहे. बिकट परिस्थितीवर ‘युवानच्या’ मदतीने मात करत तो सज्ज झाला आहे.मिळेल ते काम करून शिकलाआईने जमविलेल्या तुटपुंज्या बचतीतून खाजगी तंत्रनिकेतन कॉलेजला प्रवेश मिळवला. होस्टेल, मेसचा खर्च भागविण्यासाठी तो बाहेर राहून मिळेल ते काम करू लागला. काम करून शिकू लागला. अभ्यासासाठी वेळ मिळत नसल्याने इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या पहिल्या सत्रात ३ विषयात नापास झाला.बिकट परिस्थितीत युवानने मला शिक्षणासाठी मदत केली. त्यामुळे मला परदेशात जाण्याची संधी मिळाली. समाजाचे ऋण फेडण्यासाठी मी एका वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणार आहे. प्रशिक्षणानंतर ‘मेक इन इंडिया मोहिमेत माझा खारीचा वाटा उचलणार आहे. -दिनेश जाधव

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर