शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संडे हटके : विमानतळाचं फील आता साईंच्या दर्शनबारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 12:09 IST

साईनगरीत येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी ऊन-वा-यात लांबच लांब रांगा लावण्याचे श्रम लवकरच वाचणार आहेत़ साईबाबा संस्थानने विमानतळासारख्या सुविधा देणा-या अद्यायावत दर्शनबारीचे काम सुरू केले असून वर्षभरात हा प्रकल्प भाविकांच्या सेवेत दाखल होईल. 

प्रमोद आहेरशिर्डी : साईनगरीत येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी ऊन-वा-यात लांबच लांब रांगा लावण्याचे श्रम लवकरच वाचणार आहेत़ साईबाबा संस्थानने विमानतळासारख्या सुविधा देणा-या अद्यायावत दर्शनबारीचे काम सुरू केले असून वर्षभरात हा प्रकल्प भाविकांच्या सेवेत दाखल होईल. भाविकांचे दर्शन सुलभ व आनंददायी व्हावे यासाठी साई संस्थानच्या वतीने सुसज्ज दर्शनबारी प्रकल्प उभारला जात आहे़ दर्शनरांगेची मुख्य इमारतीचे बांधकाम २० हजार ८२ चौरस मीटर असून तळमजला ६६ हजार ५८१.६० चौरस मीटर, पहिला मजला ६ हजार १३३.०२ चौरस मीटर तर दुसरा मजला ६ हजार १३३.०२ चौरस मीटर आहे. या इमारतीमध्ये तीन भव्य प्रवेश हॉल आहे. यामध्ये प्रथमोपचार कक्ष, मोबाईल व चप्पल लॉकर्स, बायोमेट्रिक पास, सशुल्क पास, लाडू विक्री, उदी व कापडकोठी, बुक स्टॉल, डोनेशन आॅफिस, चहा, कॉफी काऊंटर, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र असे स्वच्छतागृहे, उदवाहक, पिण्याचे पाणी, वायुविजन इत्यादी व्यवस्था असतील़अन्य देवस्थानांच्या तुलनेत शिर्डीत दर्शन व्यवस्था चांगली असली तरी टाईम स्लॉटनुसार दर्शन देणार असाल तर समाधीवर क्षणभर डोक टेकवू द्या, किमान हस्तस्पर्श करू द्या, आरडाओरड करून बाहेर ढकलू नका अशी सामान्य भाविकाची अपेक्षा आहे. एकाचवेळी २४ हजार साईभक्तांची व्यवस्थाया इमारतीमध्ये एकूण एकाचवेळी २४ हजार साईभक्तांची व्यवस्था होईल. याकरिता ११२.४१ कोटी रुपये खर्च येणार आहे़ यामुळे दर्शन रांगेतील सामान्य भाविकांची फरफट थांबवणार आहे़ सध्या युद्धपातळीवर हे काम सुरू आहे़ साईसंस्थानचा अध्यक्ष होण्यापूर्वी डॉ़ सुरेश हावरे यांना साईमंदिरातील गर्दीचा वाईट अनुभव आल्याने त्यांनी पुन्हा शिर्डीला न येण्याचे ठरवले होते़ पण संस्थानचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती होताच ‘हे चित्र बदलवू’ असे त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत जाहीर केले होते़ मात्र दुर्दैवाने त्यासाठी काही झाल्याचे दिसत नाही़दुमजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर सहा असे बारा वातानुकूलित हॉल असतील़ एका हॉलची क्षमता दीड ते दोन हजार भाविकांची असेल़ भाविकांना चहा, कॉफी, बिस्किटे मोफत असतील, वॉश रूमसह सर्व सुविधा येथे असतील़ भाविकांचे दर्शन सुखकर व झटपट होईल. - रूबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान, शिर्डी.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर