शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सुजय विखे म्हणतात.., जिल्हा बँक निवडणुकीत कर्डिलेच ठरले हिरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 12:58 IST

अहमदनगर जिल्हा बँकेची नगर तालुक्यात निवडणूक झाल्याने शिवाजी कर्डिले हेच या निवडणुकीत हिरो ठरले आहेत. लोकसभेत वेगळा आणि विधानसभेत वेगळा निकाल लागला गेल्याने निश्चित कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. परंतु आम्ही भविष्यात एकसंघ राहून पुढील निवडणुका लढविणार आहोत, असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले.

राहुरी : अहमदनगर जिल्हा बँकेची नगर तालुक्यात निवडणूक झाल्याने शिवाजी कर्डिले हेच या निवडणुकीत हिरो ठरले आहेत. लोकसभेत वेगळा आणि विधानसभेत वेगळा निकाल लागला गेल्याने निश्चित कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. परंतु आम्ही भविष्यात एकसंघ राहून पुढील निवडणुका लढविणार आहोत, असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले. यावेळी त्यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर वीज प्रश्नी टीका केली.

राहुरी येथे कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हा बँकेचे नूतन संचालक शिवाजी कर्डिले यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार सुजय विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी रावसाहेब तनपुरे होते. विखे पुढे म्हणाले, राहुरीतील मंत्री असताना शेतकऱ्यांना विजेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागते हे दुर्दैव आहे. खुर्चीला चिटकून बसण्यापेक्षा राजीनामा द्यावा. आम्ही मंत्री असतो तर शेतकऱ्यासाठी राजीनामा दिला असता. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांबरोबर अन्यायाचे धोरण घेतले आहे. ऊर्जामंत्र्यांच्या तालुक्यातच शेतकऱ्यांच्या विजेच्या बाबतीत गंभीर तक्रार आहेत, असेही ते म्हणाले.

माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले, नगर जिल्ह्यात सर्व नातेवाईक कार्यकर्त्यांना आता तुम्ही समजून सांगण्याची खरी गरज आहे. माझ्याशी कोणाचे पटत नसेल तर याचा अर्थ विरोधात जाणे योग्य नाही. हा प्रश्न फक्त राहुरीकर यांचाच नाही तर सर्व जिल्ह्याचा प्रश्न आहे. आपण मागच्या दाराने प्रवेश करणार नाहीतर राहुरी विधानसभा मतदार संघात पुन्हा निवडणूक लढवणार आहे. बंद पडलेला डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरळीत करण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून नेहमीच मदत केली. यापुढेही सहकार्य राहील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी नामदेवराव ढोकणे, दत्ता पाटील दुस, उत्तम मसे, सुभाष गायकवाड, सुरेश बानकर, विक्रम तांबे, नानासाहेब गागरे, रवींद्र मसे, सुरसिंग पवार, अर्जुन बाचकर, नंदकुमार डोळस, भैय्यासाहेब शेळके, अनिल आढाव, प्रभाकर हरिचंदरे, जब्बार पठाण, साहेबराव तोडमल, साहेबराव म्हसे, सिताराम ढोकणे, आर.आर.तनपुरे उपस्थित होते.

वाड्यावर जाणाराला आमच्याकडे प्रवेश नाही

आपल्या मंडळातील पदाधिकारी असो किंवा नातेवाईक कार्यकर्ता असो. ज्यांना वाड्यावर जायचे असेल त्यांनी खुशाल जा. मात्र, त्यांना परत आमच्याकडे प्रवेश दिला जाणार नाही. वेळ आली तर मी आणि कर्डिले कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असेही खासदार सुजय विखे यांनी सांगितले.

...

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेShivaji Kardileyआ. शिवाजी कर्डिलेPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरेPoliticsराजकारण