शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या : अकोले तालुक्यातील चास गावातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 11:06 IST

तालुक्यातील चास गावामध्ये एका तरुण शेतक-याने आपली पत्नी व दोन वर्षाच्या चिमुकलीसह आपल्या राहत्या घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

अकोले : तालुक्यातील चास गावामध्ये एका तरुण शेतक-याने आपली पत्नी व दोन वर्षाच्या चिमुकलीसह आपल्या राहत्या घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या हृदय पिळवटून टाकणा-या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.पांडुरंग राधू शेळके (३१ वर्षे) हे आपली पत्नी सोनाली(२१ वर्षे) व मुलगी शिवन्या या आपल्या २ वर्षाच्या चिमुकलीसह चास गावातील गाढवी शिवारामध्ये अनेक वषार्पासून रहात होते. त्याठिकाणी एक हेक्टर शेती त्यांच्याकडे होती.मजुरी करूनही ते आपली शेती व्यवस्थित सांभाळत होते. तीन वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्यातील झोळे गावातील सोनालीशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना शिवन्या नावाची दोन वर्षे वयाची एक मुलगीही होती.सोमवार (दि.२२ आॅक्टोबर) रोजी सायंकाळी ५ वाजल्याच्या सुमारास किशोर कारभारी शेळके हा शेजारी राहणारा तरुण आपल्या मित्राकडे सहज आला. यावेळी गायीचे दूध काढलेले नसल्याने पांडुरंगला पाहण्यासाठी दरवाजा बंद असल्याने खिडकीतून डोकावले. यावेळी घडलेला प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने लगेच आपल्या इतर मित्रांना फोन करून बोलावले. पोलीस पाटील संदीप वाडेकर यांनी अकोले पोलीस स्टेशनला खबर दिली. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पो.हे.कॉ. जब्बीर सय्यद, पो.हे.कॉ. ए. पी.निपसे, पो.हे.कॉ. संतोष वाघ, पो.ना.संदीप पांडे घटनास्थळी पोहचले. बंद घराचा दरवाजा तोडून पोलिसांनी स्थानिक पंचांच्या मदतीने घरामध्ये प्रवेश केला असता पांडुरंग आपली पत्नी सोनाली व मुलगी शिवन्या यांच्यासह घरामध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहेत.घडलेल्या घटनेची वेळ निश्चितपणे सांगता येत नाही.परंतु या घटनेला अंदाजे २४ तास उलटून गेले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. अकोले पोलिसांनी झालेल्या घटनेची सी.आर.पी.सी. १७४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले