शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कासारे येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 18:57 IST

कासारे (ता. पारनेर) येथील उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरात लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी रात्री ही घटना घडली.

टाकळी ढोकेश्वर : कासारे (ता. पारनेर) येथील उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरात लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी रात्री ही घटना घडली.बाबुनाथ मालूजी दातीर (वय २८, रा. कासारे, ता.पारनेर) हे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास वडील झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. बाबुनाथ याने एमसीएम पदवी प्राप्त केली होती. तो काही वर्षे श्री ढोकेश्वर माध्यमिक विद्यालयात संगणक शिक्षक म्हणून सेवेत होता. गेल्या तीन महिन्यापासून तो पुणे येथे कामानिमित्त गेला होता. होळी सणासाठी तो गुरुवारी सायंकाळी गावाला आला होता. रात्री त्याने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली.आत्महत्येपूर्वी त्याने आई, वडिलांना चिट्ठी लिहून ठेवली. मी जे केले आहे ते मी स्वखुषीने करीत आहे. याला मी कोणालाच जबाबदार ठरवत नाही. कृपा करून आपणही कुणाला जबाबदार धरू नका. मी आयुष्यात खूप वेळा अपयशी झालो. या अपयशाच्या निराशेतून मी हे करीत आहे. त्यामुळे आपण कुणालाही जबाबदार ठरवू नका, असा चिठ्ठीतील मजकूर आहे.याबाबत बाबुनाथ याचे चुलते कोंडीबा दातीर यांनी टाकळी ढोकेश्वर दूरक्षेत्रला फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर बाबुनाथ याचा मृतदेह शुक्रवारी दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे, सहाय्यक फौजदार अशोक भोसले,पोलीस नाईक संतोष शेळके, पो.कॉ. निवृत्ती साळवे, पो.कॉ. शरद पवार करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर